शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरावरील बॉम्बहल्ल्याचा कट उधळला

By admin | Updated: February 27, 2017 05:49 IST

गुजरामधील चोटिला चामुंडा माता मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेच्या दोन संशयितांना एटीएसने अटक केली

राजकोट : गुजरामधील चोटिला चामुंडा माता मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेच्या दोन संशयितांना एटीएसने अटक केली. वसिम रामोदिया आणि नईम रामोदिया अशी या दोन संशयितांची नावे आहेत. ते दोघे भाऊ आहेत. एटीएसचे उपाधीक्षक के. के. पटेल यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे एटीएस टीमने ही कारवाई केली आहे.वसिमला राजकोट येथून तर त्याचा भाऊ नईमला भावनगर येथून अटक करण्यात आली. बॉम्ब बनविण्याचे साहित्य त्यांच्याकडे आढळून आले आहे. त्यांच्या अटकेमुळे मोठा अतिरेकी हल्ला टळला आहे. या दोघांकडे गन पावडर, बॅटरी व देशी बॉम्ब आणि मास्क आदी साहित्य होते. वादग्रस्त माहिती असलेले एक संगणकही जप्त करण्यात आले. ट्विटर आणि अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून ते देशाबाहेर दहशतवाद्यांशी संपर्कात होते, असा दावाही केला जात आहे. एकूण ६८ संशयित अटकेत‘इसिस’चे समर्थक असल्याच्या संशयावरून भारतात आत्तापर्यंत ६८ जणांना अटक करण्यात आलेले आहे. यापैकी सर्वाधिक ११ महाराष्ट्रातील आहेत. गेल्या वर्षी ‘इसिस’च्या बाजूने लढण्यासाठी गेलेल्या केरळमधील २० जणांच्या गटापैकी हाफिजुद्दिन ठेके कोलेथ हा २१ वर्षांचा तरुण अफगाणिस्तानच्या नंगरहार प्रांतात लढताना मारला गेल्याचा संदेश त्याच्या कुटुंबीयांना ‘इसिस’कडून पाठविण्यात आला.