शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
4
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
5
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
6
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
7
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
8
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
9
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
10
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
11
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
12
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
13
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
14
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
15
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
16
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
17
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
18
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
19
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
20
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
Daily Top 2Weekly Top 5

कूलर वर्क्सशॉपमधील खून प्रकरण

By admin | Updated: December 19, 2014 22:56 IST

आरोपींची ओळख परेडच घेतली नव्हती

आरोपींची ओळख परेडच घेतली नव्हती

सर्व चारही आरोपी निर्दोष : कूलर वर्क्सशॉपमधील खून प्रकरण

नागपूर : पुराव्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी आरोपींची ओळख परेडच घेण्यात न आल्याने अजनी विश्वकर्मानगर येथील एका कूलर वर्क्सशॉपमध्ये झालेल्या खून व खुनाच्या प्रयत्नातील सर्वच चारही आरोपींची अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.
हजरत अली अब्दुल रज्जाक रा. बाभूळखेडा, रफिक शेख हावीसूल शेख रा. जोशीवाडी, सद्दाम शेख अशरफूल शेख रा. चंद्रमणीनगर आणि इब्राहिम शेख अजीज शेख रा. चंद्रपूर, अशी आरोपींची नावे आहेत. विवेक मसराम रा. ताजनगर, असे मृताचे आणि गणेश दिलीप गादरवार, असे जखमीचे नाव होते. अमित रुकदास नागपुरे रा. विश्वकर्मानगर हा या प्रकरणातील फिर्यादी होता. सरकार पक्षानुसार ही घटना विश्वकर्मानगर येथील मुख्तार शेख याच्या कूलर वर्कशॉपमध्ये २३ नोव्हेंबर २०१३ रोजी घडली होती.
घटनेच्या दिवशी अमित नागपुरे याच्या भावासोबत मुख्तार शेख याचे कूलर व्यवसायातील पैशाच्या घेण्यादेण्यातून भांडण झाले होते. या भांडणाचा जाब विचारण्यासाठी अमित नागपुरे हा आपले दोन मित्र विवेक मसराम आणि गणेश गादरवार याच्यासोबत मुख्तार शेख याच्या वर्कशॉपमध्ये गेला होता. पुन्हा भांडण उद्भवून मुख्तार शेख आणि त्याच्या कामगारांनी लोखंडी रॉड आणि दंड्यांनी तिघांवरही हल्ला केला होता. त्यात विवेक मसराम आणि गादरवार हे गंभीर जखमी झाले होते. सेंटर पॉईंट इस्पितळात उपचार घेताना दुसऱ्या दिवशी विवेकचा मृत्यू झाला होता. अजनी पोलिसांनी भादंविच्या ३०२, ३०७, १४१, १४३, १४४, १४७, १४९, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक केली होती. मुख्तार शेख हा आजही फरारच आहे. पोलीस निरीक्षक बी.पी. साळंुके यांनी तपास करून न्यायालयात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. आठ साक्षीदार तपासण्यात आले. घटना, जप्ती आणि मृतदेहाचा कायद्यांतर्गत पंचनामा करण्यात आला नाही, आरोपींची ओळखपरेड घेण्यात आलेली नाही, असा बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. न्यायालयात आरोपींच्या वतीने ॲड. अब्दुल बशीर, ॲड. प्रफुल्ल मोहगावकर आणि ॲड. अमोल जलतारे यांनी काम पाहिले.