शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

सचिन पायलट यांच्यासाठी भाजपच्या पायघड्या; आज माध्यमांसमोर मांडणार बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 06:55 IST

राजस्थानमधील भाजपचे खा. व केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी पायलट यांना लोकनेते म्हटले आहे. त्यांच्यासारखा जनाधार असलेला नेता आमच्या पक्षात येत असेल तर स्वागतच आहे, असेही ते म्हणाले.

नवी दिल्ली : काँग्रेसकडूनसचिन पायलट यांची दोन पदांवरून हकालपट्टी झाल्यानंतर भाजपने त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या आहेत. भाजपचे राजस्थानमधील नेते व खा. पी. पी. चौधरी यांनी म्हटले आहे की, भाजप लोकशाहीवादी पक्ष आहे. ही विचारधारा त्यांना मान्य असेल तर त्यांचे स्वागत आहे. दरम्यान, पायलट समर्थकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.राजस्थानमधील भाजपचे खा. व केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी पायलट यांना लोकनेते म्हटले आहे. त्यांच्यासारखा जनाधार असलेला नेता आमच्या पक्षात येत असेल तर स्वागतच आहे, असेही ते म्हणाले.दुसरीकडे डोटासरा यांना काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष केल्याबद्दली टीकास्त्रही सोडले आहे. वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा इतिहास अपमानित करणाऱ्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष बनवून काँग्रेसने प्रत्येक राजस्थानीचा स्वाभिमान दुखावला आहे, असेही ते म्हणाले. भाजपने आपली भूमिका ठरवली असून, योग्यवेळी पावले उचलणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. राज्याच्या सरकारमधील घटनाक्रमावर पक्षाचे लक्ष आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.भाजपच्या संपर्कात- पायलट यांनी अद्याप आपले पत्ते उघडले नसले तरी ते भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. ते उद्या सकाळी १० वाजता माध्यमांसमोर आपली बाजू मांडणार आहेत.- तोपर्यंत ते दिल्ली जवळील मानेसरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये काँग्रेसच्या १६ व इतर आमदारांशी रणनीती बनवण्यात गुंतले आहेत.- उद्या माध्यमांसमोर जाण्यापूर्वी ते अमित शहा व नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात, असेही समजते. तोपर्यंत काँग्रेस व अपक्षांचे नेते फोडण्याचा त्यांचा प्रयत्न राहील.सोनिया गांधी यांनी लिहिली पटकथाकाँग्रेसचे नेते सचिन पायलट, विश्वेंद्र सिंह, रमेश मीणा यांना मंत्रिमंडळातून हटविण्याची पटकथा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या सांगण्यावरुन लिहिली गेली. विश्वेंद्र सिंह, रमेश मीणासह अन्य पायलट समर्थक भाजपसोबत मिळून गेहलोत सरकार पाडण्यासाठी रणनीती आखत असल्याची एक आॅडिओ आणि एक व्हिडिओ यांची माहिती सोनिया गांधी यांना देण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आॅडियोमध्ये सचिन पायलट यांचा आवाज होता आणि ते राज्यसभा निवडणुकीपूर्वीच गेहलोत सरकारला हटविण्याबाबत बोलत होते.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटRajasthanराजस्थानBJPभाजपाcongressकाँग्रेस