ऑनलाइन लोकमत
तिरुअनंतपूरम, दि. १९ - केरळमध्ये अखेर खाते उघडण्यात भाजपला यश आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केरळ विधानसभेत प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करणा-या भाजपला ओ राजागोपाल यांच्या रुपाने पहिले यश मिळाले आहे. ओ राजागोपाल केरळच्या नेमॉम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले.
( इथे पाहा २०१६ विधानसभा निवडणूक निकाल)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}हा विजय अशक्यप्राय वाटत होता. त्यांनी सीपीआय (एम)च्या व्ही. सिवानकुटटी यांचा पराभव केला. लोकसभेच्यावेळी केरळमध्ये भाजपची मतांची टक्केवारी वाढली होती. त्यामुळे विधानसभेत काही जागा मिळतील असे वाटत होते.
I salute all those who built the BJP in Kerala, brick by brick, decade after decade. It is due to them that we are seeing this day.— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2016
मतमोजणींच्या प्रारंभीच्या फे-यांमध्ये दहा जागांवर भाजप उमेदवारांनी आघाडी घेतली होती. मात्र नंतर फक्त एका जागेपर्यंत ही आघाडी मर्यादीत राहिली. राजागोपाल ८३ वर्षांचे आहेत.