शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

'मै भी चौकीदार हूँ', मोदींकडून भाजपाच्या निवडणूक पूर्व कॅम्पेनला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 1:54 PM

देशाच्या प्रगतीसाठी काम करणारा प्रत्येक भारतीय नागरिक चौकीदार आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या चौकीदार या प्रतिमेला देशपातळीवरील स्थानिक वर्गाशी जोडले आहे. केवळ मी एकटाच चौकीदार नाही, भ्रष्टाचाराची लढाई लढणारा, सामाजिक गुन्हेगारीशी लढणारा आणि वाईट प्रवृत्तींवर नजर ठेवणार प्रत्येक भारतीय चौकीदार असल्याचं मोदींनी म्हटले आहे. तसेच, देशाच्या विकासासाठी कष्ट करणारा प्रत्येकजण चौकीदार असल्याचं भाजपाने म्हटले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन व्हिडीओ शेअर केला आहे.  

देशाच्या प्रगतीसाठी काम करणारा प्रत्येक भारतीय नागरिक चौकीदार आहे. त्यामुळेच, आज प्रत्येक भारतीय मै भी चौकीदार असल्याचं सांगतो, असे म्हणत मोदींनी भाजपाच्या निवडणूकपूर्व कॅम्पेनचे लाँचिंग केले आहे. मै भी चौकीदार हे घोषवाक्य घेऊन हे कॅम्पेन चालविण्यात येणार आहे. भाजपाच्या या कॅम्पेन व्हिडीओत, देशाच्या विविध भागातील व्यक्तींना दर्शविण्यात आले असून 'मै भी चौकीदार हूँ' असे या भारतीयांकडून बोलण्यात येत आहे. झूठ के कपाल पर सत्य का प्रहार हूँ, असे म्हणत गाण्यातील एका कडव्यातून खोटं बोलणाऱ्यांवर टीका करण्यात आली आहे.  मै भी चौकीदार हूँ, या कॅम्पेनसह भाजपाने 2019 च्या लोकसभा निवडणूक अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून नरेंद्र मोदी 31 मार्च रोजी देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. दरम्यान, 11 एप्रिल रोजी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होणार आहे. 

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौकीदार ही चोर है, असे म्हणत मोदींवर प्रहार केला होता. मात्र, मोदींनी प्रत्येक भारतीय चौकीदार असल्याचे सांगत पुन्हा एकदा स्वत:च्या चौकीदार या प्रतिमेला स्थानिक पातळीवरील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे या अभियानाद्वारे केवळ मोदीच नाहीत, तर प्रत्येक भारतीय चौकीदार असल्याचं भाजपाने म्हटलं आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Twitterट्विटरIndiaभारत