शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

'भाजपा गोपाळ कांडा यांचा पाठिंबा घेणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 5:48 PM

चंदिगडमधील युटी गेस्ट हाऊसमध्ये भाजपाच्या आमदारांची बैठक झाली.

चंदीगड : हरयाणा विधानसभेत भाजपाने बहुमत मिळवत जननायक जनता पार्टीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, सिरसा मतदारसंघातून निवडून आलेले हरयाणा लोकहित पार्टीचे आमदार गोपाळ कांडा यांचे समर्थन भाजपाने नाकारले आहे. 

हरयाणात भाजपाची सत्ता स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर चंदीगडमध्ये केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद दाखल असून त्यांनी भाजपाच्या आमदारांची बैठक बोलाविली होती. यावेळी भाजपा हरयाणा लोकहित पार्टीचे आमदार गोपाळ कांडा यांचा पाठिंबा घेणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.       

चंदिगडमधील युटी गेस्ट हाऊसमध्ये भाजपाच्या आमदारांची बैठक झाली. यावेळी मनोहर लाल खट्टर यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर मनोहर लाल खट्टर यांना राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्याशी चर्चा करून हरयाणात सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहेत. हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदी मनोहरलाल खट्टर हे दुसऱ्यांदा विराजमान होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, मनोहरलाल खट्टर उद्या दुपारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

आम्ही कांडाचा पाठिंबा घेत नाही - विजहरयाणाचे मंत्री आणि भाजपाचे नेते अनिल विज यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले की, 'आम्ही गोपाळ कांडा यांचा पाठिंबा घेत नाही. त्यामुळे त्यांना सरकारमध्ये सामील करण्याचा कोणताच प्रश्न उपस्थित होत नाही.' 

गोपाळ कांडांनी दिला होता बिनशर्त पाठिंबाहरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर गोपाळ कांडा आणि इतर सहा अपक्ष आमदारांनी भाजपाला सरकार स्थापन करण्यासाठी शुक्रवारी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गोपाळ कांडा यांच्यावर एअर होस्टेसला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्यामुळे गोपाळ कांडा यांचा पाठिंबा घेण्यावर विरोधकच नाही तर भाजपानेही प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, सोशल मीडियावरील विरोध पाहता भाजपा गोपाळ कांडा यांच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेत आहे.

गोपाळ कांडा यांच्यावर आरोप 2012 मध्ये एअर होस्टेस गीतिका शर्मा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच, बलात्काराचा आरोप गोपाळ कांडा यांच्यावर ठेवण्यात आला होता. एक वर्ष तुरुंगात काढल्यानंतर गोपाळ कांडांची जामिनावर सुटका झाली. गोपाळ कांडा यांच्यावरील गंभीर आरोपामुळे देशभर त्यांच्याविरोधात संतापाची लाट पसरली होती. गोपाळ कांडा यांच्याविरोधात आंदोलन करण्यात भाजपाचाही सहभाग होता. त्याच गोपाळ कांडा यांचा हरयाणामध्ये सत्तेसाठी पाठिंबा घेण्याचे संकेत भाजपाने दिल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली होती.  

टॅग्स :HaryanaहरयाणाRavi Shankar Prasadरविशंकर प्रसादBJPभाजपा