शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
3
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
4
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
5
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
6
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
7
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
8
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
9
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
10
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
11
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
12
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
13
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
14
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
15
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
16
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
17
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
18
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
19
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
20
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मिरात भाजपाची सत्ता? अरुण जेटली : सरकार स्थापनेत पक्ष मोठी भूमिका साकारणार

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

जम्मू: जम्मू काश्मिरात सत्ता कुणाची हा प्रश्न तूर्तास अनुत्तरित असला तरी भाजपाने या दिशेने चाचपणी सुरू केली आहे़ नॅशनल कॉन्फरन्सचे(एनसी) नेते ओमर अब्दुल्ला यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा, पक्षनेते अरुण जेटली आदींशी चर्चा केल्याचे वृत्त मीडियाने दिल्याने राज्यात भाजपा-एनसीचे सरकार स्थापन होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे़ खुद्द भाजपाने या वृत्ताचे खंडन केले असून ओमर यांनी यावर थेट बोलण्यास नकार दिला आहे़

जम्मू: जम्मू काश्मिरात सत्ता कुणाची हा प्रश्न तूर्तास अनुत्तरित असला तरी भाजपाने या दिशेने चाचपणी सुरू केली आहे़ नॅशनल कॉन्फरन्सचे(एनसी) नेते ओमर अब्दुल्ला यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा, पक्षनेते अरुण जेटली आदींशी चर्चा केल्याचे वृत्त मीडियाने दिल्याने राज्यात भाजपा-एनसीचे सरकार स्थापन होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे़ खुद्द भाजपाने या वृत्ताचे खंडन केले असून ओमर यांनी यावर थेट बोलण्यास नकार दिला आहे़
दुसरीकडे भाजपाच्या सत्तास्थापनेच्या प्रयत्नांना खीळ घालण्याची काँग्रेसची योजना आहे़ मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वातील पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीने(पीडीपी) जनादेशाचा आदर करीत नव्या सरकारचे नेतृत्व करावे, असा अनाहूत सल्ला काँग्रेसने पीडीपीला दिला आहे़
जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात जास्त २८ जागा जिंकणाऱ्या पीडीपीला बहुमतासाठी अन्य पक्षाची मदत घेणे अपरिहार्य आहे. शिवाय २५ जागा मिळालेली भाजपाही सर्व पर्यायांचा अवलंब करीत सरकार स्थापण्याचा दावा करण्याच्या मनस्थितीत आहे. मात्र यापैकी भाजपाच्या सत्तास्थापनेच्या प्रयत्नांनी वेग घेतला आहे़ जम्मू काश्मिरात आमच्यासमोर अनेक पर्याय आहेत़ राज्यात कुणाचेही सरकार येवो, भाजपा त्यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारेल, असे केंद्रीय अर्थमंत्री आणि पक्षाचे केंद्रीय निरीक्षक अरुण जेटली यांनी गुरुवारी स्पष्ट केले़ जम्मू काश्मिरात नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ नवनिर्वाचित आमदारांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांना सरकार स्थापनेबाबतच्या पुढील रणनीतीवर निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिले आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले़
भाजपाच्या रणनीतीचा खुलासा करण्यास नकार देत, आम्ही अपक्ष आमदारांच्या संपर्कात आहोत, केवळ एवढेच जेटलींनी सांगितले़ राज्यातील अ्न्य पक्षांच्या नेत्यांशी चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला़

कोट
प्रतीक्षा करणे आणि येणाऱ्या घडामोडी पाहणे तूर्तास अधिक योग्य ठरेल़ आमची योजना आम्ही मीडियासमक्ष उघड करणार नाही़
-अरुण जेटली, भाजपा नेते

बॉक्स
ओमर यांच्यासोबतच्या चर्चेचा इन्कार
नवी दिल्ली : जम्मू काश्मिरात सरकार स्थापनेसंदर्भात भाजपा नेत्यांनी दिल्लीत नॅशनल कॉन्फरन्सचे(एनसी) नेते ओमर अब्दुल्ला यांची भेट घेतल्याचे वृत्त भाजपाने नाकारले आहे़ भाजपा नेत्यांनी दिल्लीत नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वाशी चर्चा केल्याचे वृत्त निराधार आहे, असे टिष्ट्वट पक्ष सरचिटणीस राम माधव यांनी यासंदर्भात केले आहे़
एनसी नेते ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी रात्री भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त मीडियाने दिले आहे़ ओमर यांचे पिता फारूक अब्दुल्ला आणि आई यांच्यावर अलीकडे लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली आहे़ त्यांना भेटण्यासाठी ओमर लंडनला जाण्याच्या तयारीने शनिवारी दिल्लीत आले होते़ मात्र येथे एक रात्र थांबल्यानंतर ओमर लंडनला न जाता आल्यापावली परत श्रीनगरला रवाना झाले़ याबाबत विचारले असता ओमर यांनी यावर बोलण्यास नकार दिला़

बॉक्स
मुफ्ती मोहम्मद सईद यांनी नेतृत्व करावे-काँगेस
श्रीनगर : मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वातील पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीने(पीडीपी) जनादेशाचा आदर करीत नव्या सरकारचे नेतृत्व करावे, असा अनाहूत सल्ला काँग्रेसने पीडीपीला दिला आहे़जम्मू काश्मिरात सर्वाधिक मोठा पक्ष ठरलेल्या पीडीपीने जनादेशाचा सन्मान करून नव्या सरकारचे नेतृत्व करावे, असे प्रदेश काँग्रेसने म्हटले आहे़
जम्मू काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सैफुद्दीन सोज यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना पीडीपीला हा सल्ला दिला़ स्थिती चिंताजनक आहे़ सत्तेचे भुकेले काही समूह व लोक विधानसभा निवडणुकीतील लोकशाही जनादेश पलटवून लावण्याच्या प्रयत्नात आहेत़ पीडीपीला लोकांनी कौल दिला आहे़ तेव्हा पीडीपीने नव्या सरकारचे नेतृत्व करावे, असे सोज म्हणाले़