शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर उभारणीसाठी गौतम गंभीरकडून १ कोटींची मदत!

By स्वदेश घाणेकर | Updated: January 21, 2021 17:19 IST

गौतम गंभीरने कोरोना संकटात अनेक समाजकार्य केले. त्यानं त्याचा खासदार फंडातील निधी दिल्ली सरकारला कोरोनाची मुकाबला करण्यासाठी दिला. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून स्थलांतरीत मजूरांनाही त्यानं भरभरून मदत केली

भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि भाजपा खासदार गौतम गंभीर ( Gautam Gambhir) यानं अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी १ कोटींचा निधी दान केला आहे. सर्व भारतीयांच्या स्वप्नातील राम मंदिर अयोध्येत उभं राहत आहे आणि त्यासाठी माझ्याकडून व कुटुंबीयांकडून हा निधी दान करण्यात येत आले, असे गंभीरनं सांगितले.  

''भव्य व सुंदर राम मंदिर हे सर्व भारतीयांचे स्वप्न आहे. अखेर एक जुना मुद्दा संपुष्टात आला. या मंदिरानंतर एकता आणि शांततेचा मार्ग प्रशस्त होईल. माझ्याकडून व कुटुंबीयांकडून या मंदिरासाठी एक छोटीशी मदत,''असे पूर्व दिल्लीचा खासदार गंभीर म्हणाला.  

दिल्ली भाजपानं या मंदिरासाठी निधी गोळा करण्यासाठी शहरात कुपन वाटप करून मोहीम राबवली आहे, असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. ''१०, १०० आणि १००० रुपयांचे हे कुपन आहेत आणि शहरातील प्रत्येक घरात जाऊन हा निधी गोळा केला जाईल,''असे दिल्ली बीजेपीचे सरचिटणीस कुलजीत चहल यांनी सांगितले. १००० रुपयांचा निधी हा धानादेशाद्वारे स्वीकारला जाणार आहे.   दरम्यान, गौतम गंभीरने कोरोना संकटात अनेक समाजकार्य केले. त्यानं त्याचा खासदार फंडातील निधी दिल्ली सरकारला कोरोनाची मुकाबला करण्यासाठी दिला. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून स्थलांतरीत मजूरांनाही त्यानं भरभरून मदत केली. एवढंच नव्हे तर तृतीय पंथीयांनाही लॉकडाऊनच्या काळात त्यानं रेशन पुरवले. आता गंभीरनं आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे आणि त्याच्या पूर्व दिल्लीच्या मतदार संघात १ रुपयांत जेवणाची सोय करणारी 'जन रसोई' सुरू केली आहे.

त्यानं गांधी नगर येथे जन रसोईच्या पहिल्या कँटिनचे उद्घाटन केले. त्यानंतर अशोक नगर येथे दुसरी कँटिन सुरू केली जाणार असल्याचे, त्याच्या कार्यालयातून सांगण्यात आले. ''कोणत्याही जाती, धर्म आणि पंथाच्या व्यक्तिला निरोगी आणि आरोग्यदायी जेवण मिळायलाच हवं, तो प्रत्येकाचा हक्कच आहे, असे मला वाटते. बेघर आणि निराधार लोकांना दोन वेळचं जेवणही मिळत नसल्याचे पाहून वाईट वाटते,''असे गंभीर म्हणाला.   

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या