शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा खासदाराने शहिदाच्या मुलीची तुलना केली दाऊदसोबत

By admin | Updated: February 27, 2017 16:20 IST

म्हैसूर येथील भाजपाचे खासदार वादात सापडण्याची शक्यता,शहिदाच्या मुलीची तुलना केली दाऊदसोबत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - म्हैसूर येथील भाजपाचे खासदार प्रताप सिम्हा वादात सापडण्याची शक्यता आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या रामजस कॉलेजमध्ये झालेल्या हिंसेनंतर त्या घटनेबबात सोशल मिडीयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामध्ये सिम्हा यांनी उडी घेतली आहे.
 
रामजस कॉलेजमध्ये झालेल्या हिंसेवर गुरमेहर कौर या विद्यार्थिनीने सोशल मीडियावर कॅंपेन सुरू केलं आहे.  त्यावर सिम्हा यांनी गुरमेहरची तुलना कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत केली आहे. त्यांनी एका बाजुला गुरमेहर आणि दुस-या बाजुला दाऊद इब्राहिमचा एक फोटो ट्विट केला. त्यावर देशद्रोही भूमिका मांडायला दाऊदने किमान वडिलांच्या नावाचा तरी वापर नाही केला असं म्हटलं आहे. या फोटोमध्ये गुरमेहरच्या हातात असलेल्या एका पोस्टरवर  माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही तर युद्धाने मारलं असं लिहीलं आहे. तर दाऊदच्या हातात असलेल्या पोस्टरवर  1993 च्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांना मी नाही मारलं तर बॉम्बमुळे ते मेले असं लिहीलं आहे. 
 
गुरमेहर कौरचे वडिल पाकिस्तानसोबत झालेल्या कारगील युद्धत शहीद झाले होते. काही दिवसांपूर्वी दिल्ली युनिव्हर्सिटीच्या रामजस कॉलेजमध्ये  AISA आणि ABVP या विद्यार्थी संघटनांमध्ये हिंसा झाली होती. हे भांडण पुण्यापर्यंत पोहोचलं होतं. गुरमेहर यामुळे दु:खी आहे. 22 फेब्रुवारीला तिने आपलं फेसबुक प्रोफाईल फोटो बदलला त्यावर  #StudentsAgainstABVP हॅशटॅग वापरून मी दिल्ली युनिव्हर्सिटीत शिक्षण घेते आणि मी अभाविपला घाबरत नाही. मी एकटी नाही आहे, भारतातील प्रत्येक विद्यार्थी माझ्यासोबत आहे असं लिहिलं होतं. हा फोटो सोशल मिडीयावर लगेच व्हायरल झाला आणि अनेक युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी अशाच आशयाचा फोटो फेसबुकवर लावला.