शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा खासदाराने आश्रमात घुसून साधूला केली मारहाण, संतप्त अनुयायांचं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 11:49 IST

West Bengal News: पश्चिम बंगालमधील भाजपाचे राज्यसभा खासदार अनंत महाराज यांनी आश्रमात घुसून एका साधूला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर सीताई परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

पश्चिम बंगालमधीलभाजपाचे राज्यसभा खासदार अनंत महाराज यांनी आश्रमात घुसून एका साधूला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर सीताई परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच ग्रामस्थांनी रस्त्यावर टायर जाळून या प्रकाराचा निषेध केला आहे. जोपर्यंत अनंत महाराज यांना अटक केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, अशा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

याबाबत करण्यात आलेल्या आरोपानुसार अनंत महाराज हे रविवारी संध्याकाळी सीताई येथील रामकृष्ण विवेकानंद सेवा आश्रमात गेले होते. यादरम्यान, अनंत महाराज यांनी धार्मिक चर्चेवरून आश्रमामधील साधू विज्ञानानंद तीर्थ महाराज यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा वाद विकोपाला जाऊन अनंत महाराज यांनी साधू विज्ञानानंद यांना धक्काबुक्की करून त्यांना मारहाण केली, असा आरोप करण्यात येत आहेत. यावेळी अनंत महाराज यांच्यासोबत त्यांचे अनेक सहकारीही तिथे होते.  

मरहाण केल्यानंतर अनंत महाराज आश्रमामधून निघून गेले. या घटनेची माहिती ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी सीताई-माथाभांगा मार्ग रोखून आंदोलनास सुरुवात केली. तसेच अनंत महाराज यांना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांना शांत केले.  दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ममता सरकारमधील मंत्री उदयन गुहा यांनी या घटनेचा निषेध केला आहे. तसेच पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, साधूला मारहाण केल्याचा आरोप झालेले भाजपा खासदार अनंत महाराज यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. मारहाणीची कुठलीही घटना घडलेली नाही. मी आश्रमात जाऊन महाराजांचं नावा, ओळख आणि शैक्षणित पात्रता विचारत होतो. त्यामुळे संतप्त होऊन त्यांनी काही सांगण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर त्या साधूंनी स्थानिक ग्रामस्थांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केली. त्यामुळे हे आंदोलन होत आहे, असा प्रत्यारोप अनंत महाराज यांनी केला.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपा