शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

CoronaVirus News: माणसं डोळ्यादेखत मरताहेत, आम्ही हतबल ठरतोय; भाजप आमदाराकडून योगी सरकारचे वाभाडे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 6:13 PM

CoronaVirus News: ऑक्सिजन पुरवठा उत्तम असल्याचा योगी सरकारचा दावा; स्वपक्षीय आमदारांकडूनच दाव्यांची चिरफाड

लखनऊ: उत्तर प्रदेश सरकारच्या कोरोना व्यवस्थापनावर भारतीय जनता पक्षाचे आमदारच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. राज्यातील परिस्थिती भीषण असून मदतीसाठी येणाऱ्यांना उपचारदेखील पुरवता येत नसल्याची पत्रं अनेक आमदारांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवली आहेत. लखनऊ मध्यचे आमदार आणि मंत्री बृजेश पाठक यांनी सर्वप्रथम अशा प्रकारचं पत्र आदित्यनाथ यांना लिहिलं होतं. आता लखीमपूर खिरीचे आमदार लोकेंद्र प्रताप सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून असहायता व्यक्त केली आहे.मोठी बातमी! नागपूरचे ऑक्सिजन टँकर्स गुजरातला नेण्याचा प्रयत्न उधळलालोकांचे मृत्यू होत आहेत आणि त्यांचे जीव वाचवण्याची इच्छा असूनही आम्ही काहीच करू शकत नाही, अशा भावना आमदार लोकेंद्र प्रताप सिंह यांनी पत्रातून व्यक्त केल्या आहेत. लोकांचे मृत्यू होत आहेत आणि मदत करायची असूनही आम्हाला मदत करता येत नाही, असं सिंह यांनी पत्रात नमूद केलं आहे. कानपूरचे खासदार सत्यदेव पचौरी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना पत्र लिहून जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली आहे.

सीरमच्या कोविशील्डबद्दल मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार; लसीकरणावर थेट परिणाम होणारराज्यात कोरोना रुग्णांची संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. कोरोनाचा कहर थांबत नाहीए. आम्ही असहायपणे आपल्या माणसांना मरताना बघत आहोत. कोरोनाच्या संकटापासून एकही गाव वाचलेलं नाही, असं सिंह यांनी पत्रात म्हटलं आहे. लखीमपूरमध्ये ऑक्सिजनचा खूप मोठा तुटवडा आहे. त्यामुळे कित्येकांचा जीव जातोय. तहसील स्तरावर सामुदायिक आरोग्य केंद्रावर ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे, असं आमदारांनी पत्रात पुढे नमूद केलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा