भाजपा आमदाराने शूर्पणखाशी केली ममता बॅनर्जींची तुलना, म्हणाले बंगाल जम्मू-काश्मीर बनेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 08:03 IST2018-04-25T08:03:14+5:302018-04-25T08:03:14+5:30

भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे.

bjp mla from bairia uttar pradesh surendra singh says west bengal cm mamta banerjee playing role of surpnakha | भाजपा आमदाराने शूर्पणखाशी केली ममता बॅनर्जींची तुलना, म्हणाले बंगाल जम्मू-काश्मीर बनेल

भाजपा आमदाराने शूर्पणखाशी केली ममता बॅनर्जींची तुलना, म्हणाले बंगाल जम्मू-काश्मीर बनेल

नवी दिल्ली- वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असणारे उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. यावेळी त्यांनी थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. ममता बॅनर्जींची तुलना शूर्पणखाशी तर काँग्रेसची तुलना रावणाशी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंदू सुरक्षित नसून लवकरच पश्चिम बंगाल जम्मू-काश्मीरप्रमाणे बनेल असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं. मंगळवारी जिल्हा पंचायत कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. 



 

भाजपा सरकार असलेल्या राज्यांमधून सर्व दहशतवादी पळून बंगालला गेले आहेत, अशीच परिस्थिती राहिली तर एक दिवस बंगाल जम्मू-काश्मीर बनेल. ममता बॅनर्जी या शूर्पणखा आहेत आणि त्यांचं नाक कापायला लक्ष्मणाने जन्म घेतला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह मिळून शूर्पणखाचं नाक कापतील असं वादग्रस्त विधान सुरेंद्र सिंह यांनी केलं. तसंच काँग्रेस रावणाच्या भूमिकेत आहेत, असंही ते म्हणाले. 



 

दरम्यान, सुरेंद्र सिंह यांनी याआधीही अशी वादग्रस्त विधानं करुन वाद ओढावून घेतला आहे. नुकतंच उन्नाव बलात्कार प्रकरणावर त्यांनी केलेलं विधान चर्चेत आलं होतं. बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगरचा बचाव करताना तीन मुलांच्या आईसोबत कोणी बलात्कार करतं का असं सुरेंद्र सिंह म्हणाले होते.
 

Web Title: bjp mla from bairia uttar pradesh surendra singh says west bengal cm mamta banerjee playing role of surpnakha