भाजप आमदाराला जुगार खेळताना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 10:45 IST2021-07-03T10:44:33+5:302021-07-03T10:45:03+5:30
घटनास्थळाहून पोलिसांनी दारूच्या ७ बाटल्या जप्त केल्या आहेत. अटक केलेल्या लोकांमध्ये १८ पुरुष, ७ महिला यांचा समावेश आहे. हे सर्व जण रिसॉर्टमध्ये जुगार खेळत होते

भाजप आमदाराला जुगार खेळताना अटक
अहमदाबाद : गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील मटर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार केसरी सिंह सोळंकी यांना पोलिसांनी अटक केली आहे. पावागढ भागात एका रिसॉर्टमध्ये ते जुगार खेळत होते, असे पोलिसांनी सांगितले. या ठिकाणाहून २५ लोकांना अटक करण्यात आली आहे.
घटनास्थळाहून पोलिसांनी दारूच्या ७ बाटल्या जप्त केल्या आहेत. अटक केलेल्या लोकांमध्ये १८ पुरुष, ७ महिला यांचा समावेश आहे. हे सर्व जण रिसॉर्टमध्ये जुगार खेळत होते आणि पार्टी सुरू होती. पोलिसांनी अधिक माहिती दिली नाही. मात्र, भाजप आमदाराला अटक केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. केसरी सिंह सोळंकी हे भाजपमध्ये असताना काँग्रेसच्या जवळचे आहेत, अशी चर्चा यापूर्वी झालेली आहे. राज्यसभा निवडणुकीत सोळंकी हे काँग्रेस उमेदवारासाठी क्रॉस व्होटिंग करू शकतात, अशीही चर्चा होती.