शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची यंत्रणा आग विझविण्याच्या कामाला!

By admin | Updated: November 9, 2015 22:59 IST

बिहारमध्ये पानिपत होताच संघ परिवारात तलवारी बाहेर निघाल्या आहेत. भाजप संसदीय मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत आग विझविण्याचा प्रयत्न झाला.

हरीश गुप्ता,  नवी दिल्लीबिहारमध्ये पानिपत होताच संघ परिवारात तलवारी बाहेर निघाल्या आहेत. भाजप संसदीय मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत आग विझविण्याचा प्रयत्न झाला. पक्षश्रेष्ठींना थेट आव्हान देणारे शॉटगन खा. शत्रुघ्न सिन्हा, आर.के. सिंग यांच्यावर कारवाईची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात होती, प्रत्यक्षात चर्चाही झाली नाही. एकूणच ही प्रदीर्घ बैठक केवळ सारवासारव करणारी ठरली.सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आरक्षणासंबंधी विधानावर जोरदार टीका होऊन खापर त्यांच्या माथी फोडण्याचे चिन्ह दिसत असताना, या बैठकीत त्यांचा भक्कम बचाव करण्यात आला. विशेषत: भाजपच्या मित्र पक्षांनी जितनराम मांझी(हम), रामविलास पासवान (लोजपा) अनुप्रिया पटेल (अपना दल) किंवा भाजपचेच हुकूमदेव नारायण यादव यांनी भागवत यांच्या विधानावर जाहीरपणे टीका केली होती. सोमवारच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली भागवत यांच्या भक्कम बचावाला समोर आले. कोणत्याही एखाद्या नेत्याच्या एखाद्या विधानामुळे बिहार निवडणुकीच्या निष्पत्तीवर परिणाम झालेला नाही, असे सांगत त्यांनी भागवत यांना दोष देण्याचे टाळले. तीन पक्षांच्या एकजुटीमुळे पराभव जेडीयू, राजद आणि काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष एकत्र येणे हे रालोआच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण झाल्याचा दावा जेटलींनी केला. २०१४ मध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढल्यामुळे या तिन्ही पक्षांना जबर फटका बसला होता. पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा राजीनामा घेण्याची शक्यताही त्यांनी फेटाळली. आम्ही चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. आम्ही देशात अन्यत्रही चांगली कामगिरी केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले