भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 11:02 IST2025-08-11T11:02:11+5:302025-08-11T11:02:50+5:30
Rajasthan Crime News: भाजपा नेत्याच्या पत्नीची त्याच्यासमोरच दिवसाढवळ्या धारदार हत्याराने गळा चिरून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील किशनगड येथे घडली आहे.

भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ
भाजपा नेत्याच्या पत्नीची त्याच्यासमोरच दिवसाढवळ्या धारदार हत्याराने गळा चिरून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील किशनगड येथे घडली आहे. या अज्ञात हल्लेखोरांनी पती-पत्नीवर हल्ला केला. यात पत्नीचा मृत्यू झाला. तर पतीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार सिलोरा येथील भाजपाने स्थानिक नेते रोहित कुमार यांची पत्नी संजू रलावता येथे माहेरी रक्षाबंधनासाठी गेल्या होत्या. तेथून त्या पती रोहित कुमार यांच्यासोबत घरी परतत असताना किशनगड येथील रस्त्यावर अज्ञात लोकांनी त्यांना अडवले. त्यांना मारहाण करून रोहित यांची पत्नी संजू यांची गळा चिरून हत्या केली.
त्यानंतर हल्लेखोर दोघांनाही तिथेच सोडून फरार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे त्यांना हत्यारासोबत दागिने आणि इतर साहित्य पडलेले आढळले. त्यांनी या पती-पत्नीला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी संजू हिला मृत घोषित केले. रोहित यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अजमेर येथील एसपी वंदिता राणा यांच्यासह पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन एफएसएल यांची टीम आमि एमओबी यांना घटनास्थली पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळावरून महिलेचे दागिने आणि इतर साहित्य जप्त केले आहे.