भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 16:37 IST2025-08-11T16:30:30+5:302025-08-11T16:37:21+5:30
Surya Hansda Encounter: भाजपाकडून विधानसभेची निवडणूक लढवलेला नेता सूर्या हांसदा याला पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे. सूर्या हांसदा हा झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे नोंद असलेला वाँटेड आरोपी होता.

भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
भाजपाकडून विधानसभेची निवडणूक लढवलेला नेता सूर्या हांसदा याला पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे. सूर्या हांसदा हा झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे नोंद असलेला वाँटेड आरोपी होता. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रविवारी सूर्या याला अटक केली होती. त्यानंतर पोलीस त्याला ललमटिया जंगलामध्ये लपवलेली शस्त्रास्त्रे जप्त करण्यासाठी घेऊन गेले होते. तिथे त्याने पोलिसांकडून शस्त्र हिसकावून घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी सूर्या हांसदा याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पठवला आहे.
सूर्या हांसदा याने २०१९ मध्ये बोरियो विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र त्याचा पराभव झाला होता. भाजपाने ताला मरांडी यांचं तिकीट कापून सूर्या हांसदा याला उमेदवारी दिली होती. तर २०२४ मध्ये त्याने जयराम महतोच्या पक्षाकडून निवडणूक लढवली होती.
सूर्या हांसदा याचा एकूण तीन वेळा विधानसना निवडणुकीत पराभव झाला होता. त्यापैकी दोन वेळा तो जेव्हीएम तर एकदा भाजपाकडून निवडणूक लढला होता. दरम्यान, जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल होते. त्यात ९ जानेवारी २०२० करोजी गोड्डा जिल्ह्यातील ठाकूरगंगटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहादुरचक जवळ अदानी कंपनीच्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये सूर्या हंसदा याचा हात असल्याचे समोर आले होते.