राम जन्मभूमीवर मनोज तिवारींनी गायलं गाणं, व्हिडिओ होतोय जबरदस्त व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 19:32 IST2020-08-05T19:26:07+5:302020-08-05T19:32:32+5:30

हे गाणे स्वतः मनोज तिवारी यांनीच लिहिले आहे आणि गायलेही आहे. कोरोना व्हायरसमुळे मनोज तिवारी यांना अयोध्येत भूमिपूजन कार्यक्रमासाठी जाता आले नाही.

BJP Leader manoj tiwaris special song for ram mandir bhumi poojan | राम जन्मभूमीवर मनोज तिवारींनी गायलं गाणं, व्हिडिओ होतोय जबरदस्त व्हायरल

राम जन्मभूमीवर मनोज तिवारींनी गायलं गाणं, व्हिडिओ होतोय जबरदस्त व्हायरल

ठळक मुद्दे हे गाणे स्वतः मनोज तिवारी यांनीच लिहिले आहे आणि गायलेही आहे.कोरोना व्हायरसमुळे मनोज तिवारी यांना अयोध्येत भूमिपूजन कार्यक्रमासाठी जाता आले नाही.मनोज तिवारी यांनी हे गाणे मंगळवारीच यूट्यूबवर टाकले आहे.

नवी दिल्ली - अयोध्येत प्रभू रामांच्या भव्य मंदिराचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी राम जन्मभूमी आंदोलनाशी संबंधित अनेक महत्वाच्या व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित होत्या. आज संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण होते. अशा वातावरणातच आर्टिस्ट आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांनीही एक विशेष गाणे गायले आहे. हे गाणे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मनोज तिवारी यांनी हे गाणे मंगळवारीच यूट्यूबवर टाकले आहे.

हे गाणे स्वतः मनोज तिवारी यांनीच लिहिले आहे आणि गायलेही आहे. 'जहां जगत में राम पधारे.' असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणे सोशल मीडियावर शेअर करत मनोज तिवारी यांनी लिहिले आहे, '#JaiShriRam अयोध्या भूमिपूजन स्पेशल गीत. जहां जगत में राम पधारे.'

कोरोना व्हायरसमुळे मनोज तिवारी यांना अयोध्येत भूमिपूजन कार्यक्रमासाठी जाता आले नाही. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, 'मी भलेही दिल्लीत बसलेलो असेल, मात्र, माझे मन अयोध्येत आहे. अनेक वर्षांची प्रतीक्षा संपत आहे. जे जेथे असतील तेथेच आयोध्या मानून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.'

महत्त्वाच्या बातम्या -

मशिदीच्या पायाभरणीवर योगींचं वक्तव्य; म्हणाले - "मला कुणी बोलावणार नाही अन् मी जाणारही नाही"

Ayodhya Ram Mandir Bhumipujan : शतकांची प्रतीक्षा संपली, राम जन्मभूमी आज मुक्त झाली - नरेंद्र मोदी

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

Web Title: BJP Leader manoj tiwaris special song for ram mandir bhumi poojan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.