मशिदीच्या पायाभरणीवर योगींचं वक्तव्य; म्हणाले - "मला कुणी बोलावणार नाही अन् मी जाणारही नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 05:58 PM2020-08-05T17:58:48+5:302020-08-05T18:11:58+5:30

यूपी सरकारने 5 फेब्रुवारीलाच अयोध्या जिल्हा मुख्यालयापासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोहावल तालुक्यातील धन्नीपूर गावात, रौनाही पोलीस ठाण्यापासून साधारणपणे 200 मीटर मागे 5 एकर जमीन मशिदीसाठी दिली आहे. तेथेच मशीत बांधली जाणार आहे. 

Yogi adityanath statement about Ayodhya mosque foundation stone | मशिदीच्या पायाभरणीवर योगींचं वक्तव्य; म्हणाले - "मला कुणी बोलावणार नाही अन् मी जाणारही नाही"

मशिदीच्या पायाभरणीवर योगींचं वक्तव्य; म्हणाले - "मला कुणी बोलावणार नाही अन् मी जाणारही नाही"

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर, कोरोना आणि अयोध्येत मशिदीचे बांधकाम आदी विषयांवर चर्चा केली.योगी म्हणाले, प्रत्येक संप्रदायाच्या लोकांची या कार्यक्रमात येण्याची इच्छा होती. मात्र, कोरोनामुळे कार्यक्रम छोटा करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने सुन्नी सेन्ट्रल वक्फ बोर्डाला अयोध्येत 5 एकर जमीन देण्याचा निर्णय दिला होता.

अयोध्या - राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर, कोरोना आणि अयोध्येत मशिदीचे बांधकाम आदी विषयांवर चर्चा केली. मशिदीच्या पायाभरणीसंदर्भात सीएम योगी म्हणाले, मला कुणी बोलावणार नाही आणि मी जाणारही नाही.

राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांना विचारण्यात आले, की विरोधक म्हणत आहेत, आपण सर्व धर्मांच्या लोकांना राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आणि सर्व आलेही. मात्र, काही दिवसांनंतर, जेव्हा अयोध्येत मशिदीच्या बांधकामाला सुरुवात होईल, तेव्हा मुख्यमंत्री तेथे जाणार नाही, असे म्हटले जात आहे.

यावर योगी आदित्यनाथ म्हणाले, माझे जे काम आहे, ते मी करेल आणि मी माझ्या कार्याला नेहमीच कर्तव्य आणि धर्म मानतो. मला माहीत आहे, की मला कुणी बोलावणार नाही. यामुळे मी जाणारही नाही.

सर्वोच्च न्यायालयाने सुन्नी सेन्ट्रल वक्फ बोर्डाला अयोध्येत 5 एकर जमीन देण्याचा निर्णय दिला होता. यूपी सरकारने 5 फेब्रुवारीलाच अयोध्या जिल्हा मुख्यालयापासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोहावल तालुक्यातील धन्नीपूर गावात, रौनाही पोलीस ठाण्यापासून साधारणपणे 200 मीटर मागे 5 एकर जमीन मशिदीसाठी दिली आहे. तेथेच मशीत बांधली जाणार आहे. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या 'राम सर्वांचेच आहेत' या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राम सर्वांचेच आहेत, हे आम्ही आधीपासूनच म्हणत आलो आहोत. ही सद्बुद्धी आधीही यायला हवी होती.

योगी म्हणाले, प्रत्येक संप्रदायाच्या लोकांची या कार्यक्रमात येण्याची इच्छा होती. मात्र, कोरोनामुळे कार्यक्रम छोटा करण्यात आला. केवळ काँग्रेसच नाही, तर भाजपाचेही कोणतेही नेते या कार्यक्रमात सहभागी झाले नाही. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्षदेखील कार्यक्रमात सहभागी झाले नही. यावेळी योगींनी अयोध्येच्या विकासकामांवरही भाष्य केले.

महत्त्वाच्या बातम्या -

Ayodhya Ram Mandir Bhumipujan : शतकांची प्रतीक्षा संपली, राम जन्मभूमी आज मुक्त झाली - नरेंद्र मोदी

Ayodhya Ram Mandir Bhumipujan : "पाच शतकांनंतर आज 135 कोटी भारतीयांचा संकल्प पूर्ण होतोय"

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

Web Title: Yogi adityanath statement about Ayodhya mosque foundation stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.