“आता तोंड उघडायला भाग पाडू नका, १०० कोटींची वसुली...”; ज्योतिरादित्य शिंदे कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 06:55 PM2021-03-24T18:55:28+5:302021-03-24T18:58:23+5:30

jyotiraditya scindia: अलीकडेच काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya scindia) यांनी राज्यसभेत बोलताना काँग्रेसवर टीका केली आहे.

bjp leader jyotiraditya scindia criticised congress over 100 crore allegation issue | “आता तोंड उघडायला भाग पाडू नका, १०० कोटींची वसुली...”; ज्योतिरादित्य शिंदे कडाडले

“आता तोंड उघडायला भाग पाडू नका, १०० कोटींची वसुली...”; ज्योतिरादित्य शिंदे कडाडले

Next
ठळक मुद्देज्योतिरादित्य शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोलराज्यसभेत बोलत असताना काँग्रेसकडून गोंधळ१०० कोटींची वसुली केली जातेय - ज्योतिरादित्यंचा आरोप

नवी दिल्ली : अलीकडेच काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya scindia) यांनी राज्यसभेत बोलताना काँग्रेसवर टीका केली आहे. महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या १०० कोटींच्या वसुली आरोप प्रकरणी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. मला तोंड उघडायला भाग पाडू नका, अशा इशारा शिंदे यांनी यावेळी बोलताना दिला. (bjp leader jyotiraditya scindia criticised congress over 100 crore allegation issue)

संसदेच्या राज्यसभेत आर्थिक विधेयकावर चर्चा सुरू होती. या विधेयकावर ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपले मत मांडायला सुरुवात केली. मात्र, यानंतर काँग्रेसकडून गोंधळ सुरू झाला. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवरून घोषणाबाजी करत आरडाओरड करण्यास सुरुवात केली. शिंदे यांच्या भाषणात अडथळा आणला गेला. त्यावेळेस ज्योतिरादित्य शिंदे यांनी, तोंड उघडायला भाग पाडू नका, असा इशारा काँग्रेस खासदारांना दिला. यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केली. 

सत्तेत येण्यासाठी काँग्रेस कोणाशीही युती करू शकतो; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

१०० कोटींची वसुली केली जातेय

तोंड उघडायला लावू नका. पब आणि रेस्तराँमधून १०० कोटींची वसुली केली जातेय आणि ती सुद्धा थेट गृहमंत्र्यांकडून, असा टोला लगावत महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसला राज्यातील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपावरून ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस खासदारांवर निशाणा साधला.

एका शहराचा १०० कोटी रुपये दर

एका शहराचा दर १०० कोटी रुपये आहे, असा टोला लगावत इंधनाचे दर वाढले आहेत हे जरी सत्य असले तरी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यालाही मर्यादा असते. महाराष्ट्रामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. इथे तुम्ही सरकारला सांगत आहात. मात्र, तिकडे महाराष्ट्रात तुम्ही यासंदर्भात काहीच करत नाहीत. ज्यांची स्वत:ची घरे काचेची असतात त्यांनी दुसऱ्यांवर दगड फेकू नयेत, एवढेच मला सांगायचे आहे, असे म्हणत ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसच्या खासदारांना चांगलेच सुनावले.  

सगळं विकून आम्ही देश चालवत नव्हतो; नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

दरम्यान, देशाच्या आर्थिक परिस्थितीवरून संसदेच्या उच्च सभागृहात वादळी चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.  देशाची अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावरून खाली उतरत आहे. आपले अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकार कोरोनाचा आधार घेतला, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली.

Web Title: bjp leader jyotiraditya scindia criticised congress over 100 crore allegation issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.