सगळं विकून आम्ही देश चालवत नव्हतो; नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 03:09 PM2021-03-24T15:09:33+5:302021-03-24T15:12:17+5:30

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

congress leader nana patole replied on devendra fadnavis statement | सगळं विकून आम्ही देश चालवत नव्हतो; नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

सगळं विकून आम्ही देश चालवत नव्हतो; नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

googlenewsNext
ठळक मुद्देफडणवीसांप्रमाणे उद्धव ठाकरे न्यायाधीश नाहीत - नाना पटोलेभ्रष्टाचारीच आमच्यावर आरोप करतायत - नाना पटोलेसगळं विकून आम्ही देश चालवत नव्हतो - नाना पटोले

मुंबई : परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत. भाजप आणि अन्य पक्ष महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधत आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सगळं विकून देश चालवत नव्हतो, काँग्रेसने देशाला उभं केलं, असं नाना पटोले म्हणाले. (congress leader nana patole replied on devendra fadnavis statement)

नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करताना काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष आहे. काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावे, असे म्हटले होते. यावर, या देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. पण देश विकून ते चालवणारी लोकं काँग्रेसला वाट्याचे सांगत असतील, तर फडणवीस सरकारमध्ये झालेली पापं राज्य सरकारने उघड करावीत. परमबीर सिंग कोणाच्या पे रोलवर होते हे सर्वांना माहिती आहे. आम्ही विधानसभेत आमची भूमिका मांडली होती, असा पलटवार नाना पटोले यांनी केला. 

लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले?; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना सवाल

RSS ला कसा वाटा पुरवला गेला 

आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो, काँग्रेसने देशाला उभं केलं आहे. वाटा आणि घाटा हे फडणवीस सरकारमध्ये सर्व जनतेने पाहिलं आहे. आरएसएसला कसा वाटा पुरवला गेला होता, आरएसएसची लोकं कशी प्रत्येक मंत्रालयात होती, फडणवीसांच्या मंत्रालयात आरएसएसची किती लोकं होती याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत, असे नाना पटोले म्हणाले.

भ्रष्टाचारीच आमच्यावर आरोप करतायत

ज्या लोकांचे हात भ्रष्टाचारात गुंतले आहेत, तेच लोकं आता आमच्यावर आरोप करत आहेत. शेतकरी आंदोलन, लसीकरणापासून वंचित भारतीय, महागाई मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी ही व्यूहरचना रचली आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. राज्यपालांची भूमिका संशयास्पद असून,  राजभवन भाजप कार्यालय झालं आहे. त्यांनी काय रिपोर्ट द्यावा हा त्यांचा अधिकार आहे. पण महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो ठेका घेतला आहे त्यासाठी जनता माफ करणार नाही, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला.

आता लवकरच ठाकरे सरकारचे विसर्जन होणार; नारायण राणेंचा दावा

फडणवीसांप्रमाणे उद्धव ठाकरे न्यायाधीश नाहीत

परमबीर सिंग दोषी आहेत की, अनिल देशमुख हे पाहावे लागेल. फडणवीसांप्रमाणे उद्धव ठाकरे न्यायाधीश नाहीत. फडणवीस मुख्यमंत्री असताना न्यायाधीशाची भूमिका निभावत होते. त्यांच्या मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर ते क्लीन चीट द्यायचे. त्यावेळी का राजीनामा घेतले नाहीत, अशी विचारणा करत राजकारणात आरोप होत असतात पण सत्यता समोर येईपर्यंत राजीनामा घेणे चुकीचे आहे, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

Web Title: congress leader nana patole replied on devendra fadnavis statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.