लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले?; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 01:23 PM2021-03-24T13:23:43+5:302021-03-24T13:26:02+5:30

Param Bir Singh Letter: संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उडवलेल्या खिल्लीला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

bjp leader devendra fadnavis replied on sanjay raut statement | लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले?; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना सवाल

लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले?; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना सवाल

Next
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीसांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तरलवंगी फटका होता की मोठा बॉम्ब हे लवकरच समजेल - फडणवीससंजय राऊत मोठे नेते नाहीत - फडणवीस

मुंबई : परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत. भाजप आणि अन्य पक्ष महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधत आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उडवलेल्या खिल्लीला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लवंगी फटाक्याला एवढे घाबरले का, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. (bjp leader devendra fadnavis replied on sanjay raut statement)

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला. यावेळी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस दिल्लीत बॉम्ब घेऊन आले होते. पण तो भिजलेला लवंगी फटका निघाला. त्याला वातही नव्हती, अशा शब्दांत संजय राऊत यांनी खिल्ली उडवली.

लवंगी फटका होता की मोठा बॉम्ब हे लवकरच समजेल

दिल्लीत काल जाऊन जो अहवाल दिला, तो लवंगी फटका होता की, मोठा बॉम्ब होता, हे लवकरच समोर येईल. तो लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले? २५ ऑगस्ट २०२० पासून तो दाबून का ठेवला? यातून कोणाचे चेहरे बाहेर येणार होते. नेमके कोण यात लिप्त आहेत, म्हणून त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही तो दाबून ठेवला, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. 

एन. व्ही. रमण होणार नवे सरन्यायाधीश; न्या. बोबडे यांनी केली केंद्राला शिफारस

संजय राऊत मोठे नेते नाहीत

शिवसेना खासदार संजय राऊत अधिकृत व्यक्ती नाही. ते काही सरकार व्यक्ती नाही. त्यांचे वक्तव्य सरकारचे अधिकृत मानले जाऊ शकत नाही. त्यांच्याकडे फार वेळ आहे. ते काही एवढे मोठे नाहीत. की त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे द्यायला हवीत, असा चिमटा फडणवीसांनी काढला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या अहवालात सरकारबद्दल काहीही चुकीचे नाही. आपण तो अहवाल वाचावा. या कागदाची काय दखल घ्यायची ते मुख्यमंत्री ठरवतील. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे काही कागदपत्रे दिली त्यात काडीचाही दम नाही. विरोधी पक्षनेते म्हणे काही बॉम्ब वगैरे घेऊन आले होते. पण, तो बॉम्ब नसून भिजलेला लवंगी फटका आहे. या फटाक्याला वातसुद्ध नव्हती, आम्हीच दिल्लीत कुठं स्फोट झाला का, हे शोधत होतो, असे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्लाय अहवालाची खिल्ली उडवली.  

आता लवकरच ठाकरे सरकारचे विसर्जन होणार; नारायण राणेंचा दावा

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. भाजपाने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. तर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपसह रिपाइं, वंचित बहुजन आघाडी आणि अन्य पक्षांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. 

Web Title: bjp leader devendra fadnavis replied on sanjay raut statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.