शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

बाळासाहेब मोदींबद्दल काय बोलले होते बघा; 'तो' व्हिडीओ दाखवत भाजपाचा सेनेवर बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2019 3:37 PM

बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल

मुंबई: ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनेकदा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधतात. मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, असंदेखील उद्धव ठाकरे अनेकदा भाषणांमधून मोदींवर शरसंधान साधताना म्हणतात. आता त्याच बाळासाहेबांच्या व्हिडीओचा आधार घेत भाजपानं शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडीओ वायरल झाला आहे. त्यात बाळासाहेबांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये मोदींची आवश्यकता सांगितली आहे. बाळासाहेब ठाकरेंची भाषणं म्हणजे धगधगता अंगार असायचा, हे भाजपाचे नेतेसुद्धा मान्य करतात. भाजपा राष्ट्रीय पक्ष असूनही त्यावेळी बाळासाहेबांचा दरारा इतकी होता की भाजपाचे राष्ट्रीय स्तरावरील दिग्गज नेते नियमितपणे मातोश्रीवर यायचे. बाळासाहेबांचे शब्द अगदी धारधार असायचे. त्यामुळे भाजपानं शिवसेनेवर बाण सोडण्यासाठी बाळासाहेबांचा आधार घेतला आहे. सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडीओत बाळासाहेब नरेंद्र मोदींचं कौतुक करत आहे. 'मेरा कहना इतना ही है. यही है की नरेंद्र मोदी गया तो गुजरात गया. हे माझं वाक्य आहे. जर नरेंद्र मोदीला तुम्ही बाजूला केलं तर गुजरात तुमचा गेला. हे माझं वाक्य आहे आणि ते मी आडवाणींपाशी बोललेलो आहे,' असं बाळासाहेब व्हिडिओत बोलताना दिसत आहेत. 

मोदींना बाजूला केलंत, तर गुजरात तुमच्या हातून जाईल, असं बाळासाहेब म्हणाले होते, याची आठवणं भाजपानं शिवसेनेला करुन दिली आहे. त्यावेळी जशी गुजरातला मोदींची गरज होती, तशीच आता देशाला मोदींची गरज आहे. अन्यथा देश हातून जाईल, असा अप्रत्यक्ष संदेश या व्हिडीओतून शिवसेनेला आणि जनतेला देण्याचा प्रयत्न या व्हिडीओतून करण्यात आला आहे. बाळासाहेबांचेच शब्द घेऊन भाजपानं शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेली शिवसेना सतत भाजपा आणि मोदींवर तोंडसुख घेत असते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं राम मंदिराचा मुद्दा हाती घेत भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार अशी घोषणा देत उद्धव यांनी अयोध्येचा दौरा केला. पुढील काही दिवसात ते मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतही जाणार आहेत. युतीसाठी आमच्या मागे रोड रोमियोसारखे फिरू नका, अशी विधानं शिवसेना नेत्यांकडून केली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ वायरल झाला आहे. 

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९