शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
3
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
4
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
5
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
6
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
7
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
8
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
9
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
11
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
12
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
13
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
15
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
16
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
17
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
18
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
19
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
20
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 

पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 6:39 AM

पित्रोदांचे हे उद्गार वर्णद्वेषी असून त्यामुळे काँग्रेसच्या लोकांमध्ये फूट पाडण्याची भूमिका उघड झाल्याची टीका भाजपने केली. कॉंग्रेसने पित्रोदांच्या वक्तव्यांशी आमचा काहीही संबंध नाही, असेही स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतात पूर्वेकडील लोक चिनी लोकांसारखे, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकी लोकांसारखे दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते व इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केले. पित्रोदांचे हे उद्गार वर्णद्वेषी असून त्यामुळे काँग्रेसच्या लोकांमध्ये फूट पाडण्याची भूमिका उघड झाल्याची टीका भाजपने केली. कॉंग्रेसने पित्रोदांच्या वक्तव्यांशी आमचा काहीही संबंध नाही, असेही स्पष्ट केले.

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे सल्लागार असलेले सॅम पित्रोदा यांनी एका पॉडकास्टमध्ये म्हटले, आम्ही गेली ७५ वर्षे सलोख्याच्या वातावरणात अतिशय आनंदाने राहात होतो. छोट-मोठे वाद झाले, पण तेही आम्ही बाजूला ठेवले. भारतासारखा देश एकसंध ठेवण्याचे काम आम्ही चांगल्या प्रकारे करू शकतो. पूर्वेकडील लोक चिनींसारखे दिसतात, दक्षिणेतील लोक आफ्रिकी लोकांसारखे दिसतात. पश्चिमेकडील लोक अरब तर उत्तर भारतातील नागरिक श्वेतवर्णीय लोकांसारखे दिसतात. मात्र त्याने काही फरक पडत नाही. हे सारे लोक आमचे बंधू व भगिनी आहेत. आम्ही विविध भाषा, धर्म, चालीरीती, आहारातील वैविध्य या गोष्टींचा आदर करतो.

भारतातील वैविध्याचे वर्णन करताना पित्रोदा यांनी जे शब्द वापरले ते दुर्दैवी असून आम्हाला ते मान्य नाहीत. पित्रोदांच्या या भूमिकेला कॉंग्रेस पक्ष पाठिंबा देत नाही. सॅम पित्रोदा यांची वक्तव्ये ही काँग्रेसची भूमिका नाही. - जयराम रमेश, महासचिव, कॉंग्रेस

सॅम पित्रोदा यांनी काढलेले वर्णद्वेषी उद्गार भारतीयांनी अजिबात खपवून घेऊ नयेत. द्रौपदी मुर्मू या सावळ्या वर्णाच्या असल्यामुळेच त्यांचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभव व्हावा, अशी काँग्रेसची इच्छा होती.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

अखेर पदाचा राजीनामा nइंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. भारतातील नागरिकांबद्दल त्यांनी काढलेल्या वादग्रस्त उद्गारांमुळे काँग्रेस वर्णद्वेषी आहे असा भाजपने आरोप केला होता. nया प्रकरणानंतर त्यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी स्वीकारला. ही घोषणा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडियावरून केली. पित्रोदा यांनी दिलेला राजीनामा पक्षाने स्वीकारला, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा