शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
6
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
7
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
8
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
9
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
10
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
11
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
12
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
13
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
14
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
15
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
16
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
18
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
19
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
20
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 10:58 IST

Som Pradosh 2024: दर महिन्यात प्रदोष व्रत असते, ते का, कसे व कधी करायचे याबद्दल सविस्तर माहितीसाठी जाणून घ्या व्रतविधी!

प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला सूर्यास्त झाल्यानंतर रात्र होण्याच्या पूर्वीचा कालावधी म्हणजे प्रदोष काळ होय. आज २० मे रोजी सोमवारी प्रदोष  येत असल्याने तिला सोम प्रदोष म्हटले जाईल. ही शिव उपासकांसाठी संधी आहे. प्रदोष काळ म्हणजेच गोधुली बेला (संध्याकाळी) सूर्यास्ताच्या दरम्यान पूजा केल्यास प्रदोष व्रत अधिक शुभ मानले जाते. 

प्रदोष व्रत भोलेशंकर भगवान शिव यांना समर्पित असल्याचे मानले जाते. सोमवारी आगमन झाल्यामुळे त्याला सोम प्रदोष म्हणतात. प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते. सोम प्रदोष व्रत केल्यामुळे भाग्य, आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती, प्रेम, कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. सोम प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. 

पौराणिक कथा : असे म्हणतात, की हे व्रत सर्वप्रथम चंद्र देवाने केले होते. त्याला क्षयरोग झाला होता. भगवान शिवाला प्रसन्न करून त्याने दिसामासाने कमी होण्याबरोबर दिसामासाने वृद्धिंगत होण्याचा वर मागून घेतला. या कथेतून प्रेरणा घेऊन आपणही सोम प्रदोषाच्या दिवशी उपास करुन पूजा करावी व संध्याकाळी फळे व दुधाचा नैवेद्य दाखवून उपास सोडावा. 

सोम प्रदोषामागे आणखीही एक व्रत कथा सांगितली जाते- 

एक विधवा स्त्री स्वतःचे व मुलाचे पालन पोषण करण्यासाठी दारोदार भीक मागत असे. मिळालेल्या अन्नातून दोघांचे पोषण होत असे. एक दिवस भीक मागत फिरत असताना तिला जखमी अवस्थेत एक मुलगा सापडला. तिला त्या मुलाची दया आली. तिने त्याला आपल्या सोबत झोपडीत नेले. त्यालाही घासातला घास खाऊ घातला. तो मुलगा बरा झाला. त्याने स्वतःची ओळख पटवून दिली. तो एका राज्याचा राजकुमार होता. परंतु शत्रूने त्याच्या राज्यावर आक्रमण करून त्याच्या वडिलांना बंदिवान केले होते. आणि त्याला राज्यातून हाकलून दिले होते. म्हणून त्याची दुरावस्था झाली होती. 

दिवस पुढे पुढे जात होते. एकदा एका गंधर्व कन्येचा राजकुमाराशी परिचय झाला आणि ती त्याच्या रूपावर लुब्ध झाली. त्याच्याशी लग्न करण्याचा तिने मनोदय व्यक्त केला. तिने आपल्या माता पित्याला तसे सांगितले. त्याची पूर्ण चौकशी करून गंधर्व कन्येच्या माता पित्याने आपल्या कन्येचा विवाह लावून दिला. आपले सैन्य राजपुत्राला देऊन शत्रूशी लढा करण्याचे बळ दिले. राजकुमाराने आपले राज्य परत मिळवले. आई वडिलांची तुरुंगातून सुटका केली आणि ज्या स्त्रीने त्याला मदतीचा हात दिला होता, त्या स्त्रीचा राजपुत्राने सांभाळ केला आणि तिच्या मुलाला भविष्यात राज्यच्या प्रधान पद बहाल केले. ती स्त्री कायम प्रदोष व्रत भक्ती भावाने करत असल्यामुळे तिचे दिवस पालटले आणि नशिबात अनपेक्षितपणे राजयोग आला. 

सोम प्रदोष व्रतासाठी पूजेसाठी शुभ वेळ - २० मे रोजी संध्याकाळी ६.४५ पासून ७. ३४ पर्यंत. 

प्रदोष पूजा विधी : या दिवशी भाविकांनी सूर्योदयाआधी उठून स्नान करावे. घर स्वच्छ करावे. देवाची पूजा करावी. शिवलिंगावर बेल वाहावे. जमल्यास दूध पाण्याने अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.  त्याचप्रमाणे महाकाल शंकराच्या महामृत्युंजय जपाचेही पठण करावे. 

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिंपुष्टिवर्द्धनम्।उर्वारुकमिव बन्धानान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्।।

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३