राहुल गांधी यांचे हे फोटो भाजपही रिट्विट करण्यापासून रोखू शकत नाही तेव्हा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 16:01 IST2018-08-24T15:59:41+5:302018-08-24T16:01:00+5:30

#RahulGandhiInBerlin: जर्मनीच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल यांनी नुकतीच जर्मनीच्या संसदेला भेट दिली होती.

bjp cant control retweeting photos of Rahul Gandhi | राहुल गांधी यांचे हे फोटो भाजपही रिट्विट करण्यापासून रोखू शकत नाही तेव्हा....

राहुल गांधी यांचे हे फोटो भाजपही रिट्विट करण्यापासून रोखू शकत नाही तेव्हा....

सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांचे ट्विटरवर टाकण्यात आलेल्या फोटोंची युजर्सनी चांगलीच खिल्ली उडविली आहे. या फोटोंना काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले होते. गंमत म्हणजे भाजपनेही हे ट्विट रिट्विट करत, या फोटोंना रिट्विट करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नसल्याची उपरोधिक टीप्पणी केली आहे. 


जर्मनीच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल यांनी नुकतीच जर्मनीच्या संसदेला भेट दिली होती. यावेळी राहुल यांनी वेगवेगळ्या अँगलमध्ये फोटो काढले होते. या सर्व फोटोंना काँग्रेसच्या ट्विटर हँडलने पोस्ट करत 'राहुल गांधी यांच्या भावमुद्रा' असे कॅप्शन दिले होते. 
मात्र, ट्विटर युजर्सनी या फोटोंना काल्पनिक रुप देऊन ट्रोल केले. पहा ट्विटरकर काय काय म्हणाले...

भाजपने केलेले रिट्विट...



युजर्सनी केलेले ट्रोल...





 

Web Title: bjp cant control retweeting photos of Rahul Gandhi