झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून ५२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 12:06 IST2019-11-10T18:14:33+5:302019-11-20T12:06:43+5:30

झारखंड विधानसभेच्या  81 जागांसाठी निवडणुका पाच टप्प्यात मतदान होणार असून, 23 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

BJP announces first list of 52 candidates for Jharkhand Assembly elections | झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून ५२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून ५२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

नवी दिल्ली:  झारखंड विधानसभेच्या  81 जागांसाठी निवडणुका पाच टप्प्यात मतदान होणार असून, 23 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी भाजपाने 52 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. 30 नोव्हेंबर रोजी पहिला टप्पा,  7 डिसेंबर रोजी दुसरा टप्पा, 12 डिसेंबर रोजी तिसरा टप्पा, 16 डिसेंबर रोजी चौथा टप्पा आणि 20 डिसेंबर रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान  होईल. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 23 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

झारखंडमध्ये विधानसभेच्या 81 जागा आहेत. सध्या राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आहे. राज्यात काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे प्रमुख विरोधी पक्ष आहेत. त्याशिवाय संयुक्त जनता दल, जेव्हएम, बीएसपी, एजेएसयू हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात असतील. 

Web Title: BJP announces first list of 52 candidates for Jharkhand Assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.