शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांचा संवाद तुटतोय!...1

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

अंगणातून घरात आणि घरातून अगदी माजघरात ऐकायला येणारा चिमण्यांचा चिवचिवाट, प्राजक्ताच्या झाडावरून हळूच डोकावणाऱ्या कोकिळेची मंजूळ साद तुम्ही किती दिवस झालेत नाही ऐकलीत? नाही आठवत ना...? कसं आठवेल, कारण ही सादच मुळात हरवली आहे अन् याचे मुख्य कारण आहे दिवसेंदिवस वाढत चाललेले नागपुरातील ध्वनिप्रदूषण. या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आता पक्ष्यांवरही होत असून त्यांचा आपसातील संवादही संपुष्टात येत आहे. त्याची तीव्रताही इतकी की नुकत्याच जन्माला आलेल्या व भुकेने व्याकुळ झालेल्या छोट्या पिल्लांचा आवाजसुद्धा त्यांच्या आईपर्यंत पोहोचत नाही. परिणामी वेळेत अन्न न मिळाल्याने त्यांचा अकाली मृत्यू होत आहे. पक्ष्यांची संख्या कमी होण्याचे हेही एक मुख्य कारण आहे.

अंगणातून घरात आणि घरातून अगदी माजघरात ऐकायला येणारा चिमण्यांचा चिवचिवाट, प्राजक्ताच्या झाडावरून हळूच डोकावणाऱ्या कोकिळेची मंजूळ साद तुम्ही किती दिवस झालेत नाही ऐकलीत? नाही आठवत ना...? कसं आठवेल, कारण ही सादच मुळात हरवली आहे अन् याचे मुख्य कारण आहे दिवसेंदिवस वाढत चाललेले नागपुरातील ध्वनिप्रदूषण. या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आता पक्ष्यांवरही होत असून त्यांचा आपसातील संवादही संपुष्टात येत आहे. त्याची तीव्रताही इतकी की नुकत्याच जन्माला आलेल्या व भुकेने व्याकुळ झालेल्या छोट्या पिल्लांचा आवाजसुद्धा त्यांच्या आईपर्यंत पोहोचत नाही. परिणामी वेळेत अन्न न मिळाल्याने त्यांचा अकाली मृत्यू होत आहे. पक्ष्यांची संख्या कमी होण्याचे हेही एक मुख्य कारण आहे.

गाड्यांचे हॉर्न, माणसांचा गोंगाट उठलाय जीवावर
पूर्वी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट हमखास ऐकायला यायचा. त्यात पक्ष्यांच्या पिल्लांचाही आवाज असायचा. पण अलीकडच्या काळात हा आवाज कमी होत चालला आहे. कमी होण्यापेक्षा त्यांचा हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतच नाही आहे. त्याची कारण अनेक असली तरी त्यातलं महत्त्वाचं एक कारण म्हणजे ध्वनिप्रदूषण आहे. शहरातील गाड्यांचे हॉर्न, मोठ्याने वाजवले जाणारे स्पीकर, माणसांचा गोंगाट यांमुळे पक्ष्यांच्या पिल्लांचा जीव धोक्यात आला आहे. वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे या छोट्या पिल्लांना त्यांच्या पालकांचा आवाज पोहोचत नाही. त्यामुळे पिल्लांना आता खायचं आहे, हे कळत नाही. परिणामी, ते उपाशीच राहतात. तसंच एखाद्या भक्ष्याला बळी पडतात. अन्नासाठी आणि संरक्षणासाठी पूर्णपणे आपल्या पालकांवर अवलंबून असलेल्या आणि उडू न शकणाऱ्या पक्ष्यांच्या पिल्लांची काळजी घेण्याची जबाबदारी आता समाजासमोर आली आहे.
पक्षी विसरले आईचा आवाज
पक्षी आपल्या पिल्लांना जसा आदेश देतात, त्या आदेशाचे पालन इवलेसे जीव करतात. पण पक्ष्यांचा हा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे या पक्ष्यांचं आयुष्य धोक्यात आलं आहे, हे पक्ष्यांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. डलहौसी विद्यापीठाने पक्षी आपल्या पिल्लांचं संरक्षण कसं करतात आणि त्यांना कसं भरवतात याचा शोध घेतला घेतला असता हा गंभीर प्रकार उघडकीस आला.