अरेच्चा! अचानक गटारातून वाहू लागल्या ५०० रुपयांच्या नोटा; उचलण्यासाठी लोकांची मोठी झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 13:02 IST2026-03-01T13:01:49+5:302026-03-01T13:02:29+5:30

एका गटारातून अचानक ५००-५०० रुपयांच्या नोटा वाहू लागल्या. हे दृश्य पाहताच स्थानिक लोकांमध्ये नोटा उचलण्यासाठी मोठी झुंबड उडाली.

bikaner people found 500 notes in sewerage chamber video goes viral | अरेच्चा! अचानक गटारातून वाहू लागल्या ५०० रुपयांच्या नोटा; उचलण्यासाठी लोकांची मोठी झुंबड

फोटो - आजतक

राजस्थानच्या बीकानेरमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका गटारातून अचानक ५००-५०० रुपयांच्या नोटा वाहू लागल्या. हे दृश्य पाहताच स्थानिक लोकांमध्ये नोटा उचलण्यासाठी मोठी झुंबड उडाली. बघता बघता गटाराजवळ लोकांची प्रचंड गर्दी जमा झाली आणि प्रत्येकजण मिळेल तशा नोटा एकमेकांच्या हातातून आणि गटारातून घेऊ लागले. 

व्हायरल होणऱ्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, लोक गटारातून नोटा काढल्यानंतर त्या स्वच्छ करून वाळत घालत आहेत. तसेच या नोटा खऱ्या आहेत की खोट्या याचीही खातरजमा करताना लोक दिसत आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

बीकानेरमध्ये जेव्हा लोकांना गटारामध्ये ५०० रुपयांच्या नोटा पडलेल्या दिसल्या, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. अनेक लोकांनी या नोटा बाहेर काढून स्वच्छ पाण्याने धुतल्या आणि सुकवण्यासाठी ठेवल्या. काही लोकांनी तर आपल्या बाईकवरही या नोटा वाळत ठेवल्या होत्या. नोटांची शहानिशा करण्यासाठी लोक त्या नीट तपासून पाहत होते.

नोटा घेण्यासाठी झालेली गर्दी पाहून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. एका व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी हातात लाठी घेऊन लोकांना पळवून लावताना दिसत आहेत.

'इंडिया टुडे'ला मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी नंतर सर्व नोटा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. या नोटा खऱ्या आहेत की खोट्या, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम गटारात आली कुठून? कारवाईच्या भीतीने कोणी या नोटा वाहून तर दिल्या नाहीत ना? या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. 

Web Title : बीकानेर: नाले में बहे 500 के नोट, मची लूट!

Web Summary : बीकानेर में एक नाले से 500 रुपये के नोट बहने से अफरा-तफरी मच गई। स्थानीय लोगों ने नोट इकट्ठा किए, जिससे भगदड़ मच गई। पुलिस ने हस्तक्षेप कर मामले की जांच शुरू कर दी है। नोटों की प्रामाणिकता जांची जा रही है।

Web Title : Bikaner: ₹500 notes flow from drain, frenzy ensues.

Web Summary : In Bikaner, ₹500 notes flowing from a drain caused a frenzy. Locals collected the notes, sparking chaos. Police intervened, investigating the source and authenticity of the cash. The incident is under investigation.