शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये नितीशकुमार मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार

By admin | Updated: June 9, 2015 01:03 IST

बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार राहणार असल्याची औपचारिक घोषणा प्रस्तावित जनता परिवाराचे अध्यक्ष मुलायमसिंह यांनी सोमवारी केली.

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार राहणार असल्याची औपचारिक घोषणा प्रस्तावित जनता परिवाराचे अध्यक्ष मुलायमसिंह यांनी सोमवारी केली. राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या विरोधामुळे युती होणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला असतानाच मुलायमसिंह यांनी हा मुद्दा निकाली निघाल्याचे संकेत दिले आहेत. जातीयवादी शक्तींना पराभूत करण्यासाठी हे दोन नेते एकजुटीने लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांनी रविवारी दिल्लीत चर्चा करीत राजद- संजद (जेडी- यू) युतीचा मार्ग प्रशस्त केला होता. सोमवारी मुलायमसिंह यादव यांनी एका पत्रपरिषदेत नितीशकुमार यांचे नाव जाहीर केले तेव्हा लालूप्रसाद यादव, संजदचे अध्यक्ष शरद यादव, समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते राम गोपाल यादव उपस्थित होते. राजद आणि संजदचे विलीनीकरण झाले नसतानाही या दोन पक्षांमध्ये जागावाटपाबाबत कोणतीही समस्या उद्भवणार नाही. संघर्षाची स्थिती उद्भवल्यास माझाच निर्णय अंतिम राहील, असे मुलायमसिंह यांनी स्पष्ट केले. लालूप्रसाद यांच्या कुटुंबातील कुणीही लढण्यास इच्छुक नाही, असेही त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)एप्रिलमध्ये जनता परिवारातील सहा पक्षांच्या विलीनीकरणाची घोषणा झाली होती. प्रस्तावित जनता परिवाराची धुरा मुलायमसिंग यांच्याकडेच सोपविण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यांनी पत्रपरिषदेत विलीनीकरणाच्या मुद्यावर भाष्य टाळले.——————————————————लालूप्रसाद म्हणाले, सर्व प्रकारचे विष घेण्याची तयारीलालूप्रसाद आणि नितीशकुमार हे एकेकाळी कट्टर विरोधक मानले जात होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४० जागा जिंकत दोघांच्याही पक्षांना भुईसपाट केल्यामुळे जनता परिवाराच्या निमित्ताने त्यांच्यात एकजूट होणे ही अपरिहार्यता मानली जात आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाला मान्यता दिल्याबद्दल लालूप्रसाद म्हणाले की, सर्व प्रकारचे विष घेण्याची माझी तयारी आहे. जातीयवादाचा कोब्रा आम्हाला चिरडून टाकायचा आहे. एकजुटीने आम्ही त्यांना उद्ध्वस्त करू. भाजपला बिहारमधून हद्दपार करू. मी आणि नितीश एकाच कुटुंबातील आहोत. आमच्यात मतभेद आणि लढाया झाल्या. आम्ही परस्परांवर आरोप केले. बिहारमधील राज्यसभा निवडणुकीच्यावेळी जेडीयूमध्ये फूट पडल्याने भाजपला रोखण्यासाठी मी नितीशकुमार यांची भेट घेतली. मी त्यांना समर्थन जाहीर केले. जातीयवादी शक्तींनी मीडियातून सर्वप्रकारच्या अफवा पसरविल्या. आम्ही एकत्र येऊ शकत नाही, असा त्यांचा दावा होता.——————————————-आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून नितीशकुमार यांचे नाव समोर केल्याबद्दल मी मुलायमजींचे आभार मानतो. मी निवडणूक लढू शकत नाही. माझी पत्नी किंवा कुटुंबातील कुणालाही त्यात स्वारस्य नाही. माझी मुले लहान आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी आमच्या पक्षाकडून किंवा कुटुंबातून कोणताही उमेदवार असणार नाही. - लालूप्रसाद यादव, अध्यक्ष राजद.——————————-लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांच्यातील ऐक्यामुळे मला आनंद झाला आहे. नितीशकुमार हे बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार राहतील. लालूजींनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. लालूजींनी प्रचाराचे आश्वासन दिले आहे. कोणतेही मतभेद नाहीत. मतभेदांना थारा दिला जाणार नाही. जातीयवादी शक्तींना उखडून फेकण्यासाठी हे दोन नेते एकत्र आले आहेत. - मुलायमसिंग यादव, अध्यक्ष, समाजवादी पक्ष.