शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

दोन पोलिसांचा न्यायाधीशांवर हल्ला, नोटीस जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 4:40 PM

न्या. अविनाश कुमार सुखरुप आहेत; परंतु अचानक घडलेल्या या प्रकाराने ते जाम हादरले आहेत.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हे प्रकरण प्रथम सकृतदर्शनी न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यासाठी धोका असल्याचे दिसते, असे मत व्यक्त करुन राज्याचे मुख्य सचिव, बिहारचे पोलीस प्रमुख, गृह विभागाचे प्रधान सचिव आणि मधुबनीच्या पोलीस अधीक्षकांना नोटीस जारी केली.

पाटणा : बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात गुरुवारी  कोर्टरुममध्ये घुसून दोन पोलिसांनी  न्यायाधीशांवर हल्ला केला. या प्रकरणाची स्वत:हून  दखल घेत  पाटणा उच्च न्यायालयाने  राज्याच्या पोलीस प्रमुखांना स्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.  गुरुवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली.कोर्टरुममध्ये एका प्रकरणावर सुनावणी चालू असताना दोन पोलिसांनी  आत घुसून झांझरपूरचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश  अविनाश कुमार यांच्यावर बंदूक रोखून त्यांना मारहाण केली.  

न्या. अविनाश कुमार सुखरुप आहेत; परंतु अचानक घडलेल्या या प्रकाराने ते जाम हादरले आहेत. न्यायाधीशांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करणारे वकील आणि कोर्टाच्या कर्मचाऱ्यांवरही ठाणे अधिकारी गोपाल कृष्णा आणि उपनिरीक्षक अभिमन्यू कुमार यांनी हल्ला करुन त्यांना जखमी केले. ही घटना धक्कादायक आणि अभूतपूर्व आहे, असे न्या. राजन गुप्ता आणि मोहीत कुमार शहा यांच्या खंडपीठाने म्हणत पोलीस प्रमुखांना  २९ नोव्हेंबर रोजी बंद लखोट्यात या घटनेशी संबंधित स्थिती अहवाल  सादर करण्याचे आदेश दिले. त्याच दिवशी खंडपीठ पुन्हा सुनावणी घेणार आहे. पोलीस प्रमुखांना त्या दिवशी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

नोटीस जारीउच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हे प्रकरण प्रथम सकृतदर्शनी न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यासाठी धोका असल्याचे दिसते, असे मत व्यक्त करुन राज्याचे मुख्य सचिव, बिहारचे पोलीस प्रमुख, गृह विभागाचे प्रधान सचिव आणि मधुबनीच्या पोलीस अधीक्षकांना नोटीस जारी केली. याच वर्षी सप्टेंबरमध्ये  न्या. अविनाश कुमार यांनी छेडछाडीच्या प्रकरणातील आरोपीला त्याच्याच गावांतील सर्व महिलांचे कपडे सहा महिने मोफत धुण्याचे आणि इस्री करण्याच्या अटीवर जामीन दिला होता.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस