बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 19:31 IST2025-11-11T19:29:48+5:302025-11-11T19:31:19+5:30
Bihar Election 2025 Exit Poll LIVE: बिहारमध्ये भाजप, जेडीयू , आरजेडी आणि काँग्रेस यांच्यातच खरी चुरस होती. आता एनडीएमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु होणार आहे.

बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
बिहार विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनी धमाका करून टाकला आहे. गेल्या निवडणुकीत टफ फाईट देणाऱ्या तेजस्वी यांना मोठ्या निराशेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. बहुतांश नाही सर्वच एक्झिट पोलनी बिहारमध्ये एनडीएचे सरकार प्रचंड बहुमताने सत्ता राखत असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
बिहारमध्ये भाजप, जेडीयू , आरजेडी आणि काँग्रेस यांच्यातच खरी चुरस होती. आता एनडीएमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु होणार आहे. गेल्यावेळी भाजपाने जास्त जागा असूनही पुन्हा एकदा नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री पद बहाल केले होते. परंतू, यावेळी नितीश कुमार यांच्याऐवजी भाजपा आपल्या चेहऱ्याला संधी देते का याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाने खाते उघडण्याचे संकेत दिले असून या पक्षाने महाआघाडीचे गणित बिघडविले असल्याचे अंदाज येत आहेत.
- POLSTRAT नुसार, NDA ला 133-148 जागा, महाआघाडीला 87-102 आणि इतरांना 3-5 जागा मिळू शकतात. यामध्ये भाजप 68-72 जागा, जदयू 55-60, LJP (R) 9-12, HAM 1-2 आणि RLM 0-2 जागा जिंकू शकतात.
- पोल्स ऑफ पोल्स नुसार एनडीए १३८-१५५ जागा जिंकू शकते. महाआघाडीला ८२-९८, जनसुराजला ०-२ आणि इतरांना ३-७ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
- पीपल्स इनसाईटनुसार एनडीएला १३३-१४८ जागा मिळतील, तर महाआघाडीला ८७-१०२ जागा मिळतील, असा अंदाज आहे.
- जेव्हीसी एक्झिट पोलमध्ये एनडीएला १३५-१५० जागा मिळतील, तर महाआघाडीला ८८-१०३ जागा मिळतील आणि इतरांना ३-६ जागा मिळतील असा अंदाज आहे.
- मॅट्रिज-आयएएनएसनुसार एनडीएला १४७-१६७ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाआघाडीला ७०-९० जागा मिळण्याचा अंदाज आहे. जनसुराज्यसह इतरांना २-३ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
- चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या अंदाजानुसार एनडीएला १३०-१३८ जागा, महाआघाडीला १००-१०८ आणि जनसुराज्यसह इतरांना ३-५ जागा मिळतील, असा अंदाज आहे.
- पीपल्स पल्स एक्झिट पोलनुसार, एनडीएला १३३-१५९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. महाआघाडीला ७५-१०१ जागा आणि जेएसपीला ०-५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतरांना २-८ जागा मिळण्याची शक्यता आहे.
- डीव्ही रिसर्चने देखील जनसुराज्य पक्षाला २-४ आणि ओवेसींच्या पक्षाला ०-२ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर एनडीएला १३७-१५२ जागा, महाआघाडीला ८३-९८ जागा दाखविल्या आहेत.