कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:35 IST2025-11-14T15:35:26+5:302025-11-14T15:35:51+5:30

भाजपने 101 जागा लढल्या होत्या, त्यांपैकी जवळपास 95 जागांवर आघाडी मिळवत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनताना दिसत आहे. तर जेडीयू 84 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसऱ्या बाजूला राजदची 30 जागांपर्यंत पोहचतानाही दमछाक होताना दिसत आहे.

bihar election results 2025 The cash Katta campaign shattered Tejashwi's dreams; But even after the victory, BJP is in great tension! The government can be formed without Nitish Kumar but | कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...

कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...


बिहार विधानसभा निवडणुकीच्या आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, राज्याचे राजकीय समीकरण जवळपास स्पष्ट झाले आहे. येथे एनडीए पुन्हा एकदा सत्तेवर येत असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. महाअघाडीचे तर 40 जागांपर्यंत पोहोचणेही अवघड दिसत आहे. भाजपने 101 जागा लढल्या होत्या, त्यांपैकी जवळपास 95 जागांवर आघाडी मिळवत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनताना दिसत आहे. तर जेडीयू 84 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसऱ्या बाजूला राजदची 30 जागांपर्यंत पोहचतानाही दमछाक होताना दिसत आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, निवडणूक आचारसंहिता लागल्यानंतरही, नीतीश सरकारने राज्यातील 1.7 कोटी महिलांच्या खात्यात 10000 रुपये जमा करण्याच्या योजनेचा घेतलेला निर्णय, हा एनडीएसाठी खास टर्निंग पॉइंट ठरला. या कॅश योजनेमुळे महिलांचे मतदान पुरुषांच्या तुलनेत 8.15 टक्क्यांनी अधिक झाले. यानिवडणुकीत 62.98% पुरुषांचे तर 71.78% महिलांचे मतदान नोंदवले गेले. बिहारमध्ये एकूण 3.51 कोटी महिला मतदार आहे. त्यांच्या एकमुखी पाठिंब्याचा भाजपला मोठा फायदा होताना दिसत आहे.

पंतप्रधान मोदींचा जोरदार प्रचार -
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभांमध्ये ‘कट्टा आणि खंडणी’ यांसारखे शब्द सातत्याने वापरले गेले. राजद पुन्हा सत्तेवर आला तर पुन्हा तत्कालीन परिस्थिती निर्माण होईल, असा संदेश मतदारांमध्ये रूजवला गेला. यामुळे मतदारांतील 'जंगलराज'च्या आठवणी ताज्या झाल्या. याशिवाय, दुसऱ्याबाजूला तेजस्वी यादव यांनी महिलांना दर महिन्याला 2500 रुपये देण्याचे आश्वासन दिले, मात्र नीतीश कुमार यांनी केलेले काम आणि दिलेला खात्रीशीर लाभ यावर महिलांनी अधिक विश्वास ठेवला. एक्झिट पोल्सचे निष्कर्षही याचीच पुष्टी करणारे होते.

भाजप सरकार स्थापन करू शकतो पण एक टेन्शन...! -
महत्वाचे म्हणजे, एनडीएच्या विजयानंतरही भाजपसमोर एक नवा पेच आहेच. हा पेच आहे मुख्यमंत्रीपदाचा. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. आतापर्यंतच्या निकालानुसरा, भाजप 95, एलजेपीआर 25, हम 5 आणि आरएलएम 4 अशा एकूण 129 जागांवर आघाडीवर आहेत, तर बहुमतासाठी केवळ 122 जागांचीच आवश्यकता आहे. याशिवाय जेडीयू 83 जागांवर आघाडीवर आहे. या जागा निकालात बदलल्या तर भाजप नीतीश कुमारांच्या जेडीयू शिवायही सत्ता स्थापन करू शकतो, राज्यात बहुमत सिद्ध करू शकतो आणि आपला मुख्यमंत्री बनवू शकतो. मात्र असे असले तरी, भाजपला पुढील राजकीय समीकरणांचे भान राखतच पावले टाकावी लागणार आहेत. कारण, राजनीतिक जानकारांच्या मते, भाजपने असे केल्यास, केंद्र सरकारवरही परिणाम होऊ शकतो. याहूनही मोठी गोष्ट म्हणजे, भाजपा विरोधात चुकीचा नरेटिव सेट होऊ शकतो.
 

Web Title : बिहार चुनाव: एनडीए की जीत, भाजपा के लिए जीत के बाद भी दुविधा।

Web Summary : एनडीए ने बिहार में जीत हासिल की, भाजपा सबसे बड़ी पार्टी बनी। महिला मतदाताओं ने एनडीए की योजनाओं को पसंद किया। भाजपा जदयू के बिना सरकार बना सकती है, लेकिन राजनीतिक चुनौतियां हैं।

Web Title : Bihar Election: NDA victory, BJP's dilemma despite win, future uncertainties.

Web Summary : NDA secures Bihar victory, BJP emerges largest party. Women voters favored NDA's schemes. BJP can form government without JDU but faces political challenges and potential national repercussions.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.