बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:08 IST2025-11-14T12:07:16+5:302025-11-14T12:08:34+5:30
Bihar Election: बिहारच्या राजकारणात नेहमीच ‘बाहुबली’ नेत्यांचे वर्चस्व राहिले आहे.

बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
Bihar Election Result 2025: बिहारच्या राजकारणात नेहमीच ‘बाहुबली’ नेत्यांचे वर्चस्व राहिले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा प्रभाव ठळकपणे जाणवतोय. या निवडणुकीत सुमारे 12 जागांवर बाहुबली नेते किंवा कुटुंबीय निवडणूक लढवत असून, बहुतांश ठिकाणी त्यांची मजबूत पकड दिसत आहे.
बाहुबली नेते किंवा त्यांच्या कुटुंबीयांना प्रमुख पक्षांमधून तिकीट मिळणे, हे मतदारसंघांतील जातीय समीकरणे, स्थानिक वर्चस्व आणि नेतृत्वाची पकड, यावरुन ठरते. आतापर्रंय हाती आलेल्या निकालांनुसार, अनेक ठिकाणी बाहुबली नेते आघाडीवर आहेत. काही ठिकाणी तर बाहुबली विरुद्ध बाहुबली अशी स्पर्धा आहे.
नितीश कुमारांच्या पराभवाचा दावा करणाऱ्या पीकेंना मोठा धक्का, 'जनसुराज'चा प्रयोग सपशेल अपयशी
या 12 जागांवर बाहुबली मैदानात
मोकामा, तरारी, रधुनाथपुर, मांझी, संदेश, दानापुर, वारिसलीगंज, बनियापुर, शाहपुर, लालगंज, बेलागंज आणि बाढ़.
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार कोण पुढे? पाहा...
मोकामा
आघाडीवर: जेडीयूचे बाहुबली नेते अनंत सिंह
त्यांच्याविरोधात आरजेडीची वीणा देवी आणि जनसुराजचे पीयूष प्रियदर्शी
तरारी
आघाडीवर: विशाल प्रशांत (भाजपा)
बाहुबली सुनील पांडेय यांचा मुलगा
त्यांची टक्कर CPI(एम) चे मदन सिंह आणि जनसुराजचे चंद्रशेखर सिंह यांच्याशी
रधुनाथपुर
आघाडीवर: ओसामा शहाब (आरजेडी)
माजी खासदार शहाबुद्दीनचा मुलगा
एनडीएचे विकास कुमार सिंह आव्हान देत आहेत
मांझी
आघाडीवर: रणधीर कुमार सिंह (जेडीयू)
बाहुबली प्रभुनाथ सिंह यांचे पुत्र
CPI(एम) आणि जनसुराज पक्ष विरोधात
संदेश
आघाडीवर: दीपू यादव (आरजेडी)
बाहुबली अरुण यादव यांचे पुत्र
जेडीयूचे राधाचरण सिंह कडवी टक्कर देत
दानापूर
आघाडीवर: रीतलाल यादव (आरजेडी)
त्यांच्या विरुद्ध भाजपा नेता रामकृपाल यादव पिछाडीवर
वारिसलीगंज
आघाडीवर: अरुणा देवी (भाजपा)
बाहुबली अखिलेश सिंह यांची पत्नी
त्यांच्याविरोधात आरजेडीची अनीता देवी, बाहुबली अशोक महतो यांच्या पत्नी
थेट 'बाहुबली विरुद्ध बाहुबली' सामना
बनियापूर
आघाडीवर: चांदनी देवी (आरजेडी)
दिवंगत बाहुबली अशोक सिंह यांच्या पत्नी
भाजपा उमेदवार केदारनाथ सिंह मागे
शाहपूर
आघाडीवर: राहुल तिवारी (आरजेडी)
भाजपा उमेदवार राकेश रंजन मागे
लालगंज
आघाडीवर: शिवानी शुक्ला (आरजेडी)
बाहुबली मुन्ना शुक्ला यांची मुलगी
भाजपाचे संजय कुमार सिंह मागे
बेलागंज
आघाडीवर: मनोरमा देवी (जेडीयू)
त्यांच्या विरोधात आरजेडीचे बाहुबली विश्वनाथ कुमार सिंह
बाढ
आघाडीवर: सियाराम सिंह (भाजपा)
आरजेडीचे बाहुबली कर्णवीर सिंह उर्फ लल्लू मुखिया मागे