शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:59 IST

Ajit Pawar NCP In Bihar Election 2025 Result: बिहार विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी आघाडीही घेतली नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Ajit Pawar NCP In Bihar Election 2025 Result:  बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या महासंग्रामाचा निकाल लागत आहे. सुरुवातीला जे कल हाती आले, त्यानुसार एनडीएची वाटचाल आता २०० जागांच्या दिशेने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तर महागठबंधन अवघ्या ३९ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणुकीत नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, अजितदादांच्या एकाही उमेदवाराला दखलपात्रही कामगिरी करता आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिटही वाचणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देशभरात बऱ्यापैकी हातपाय पसरले होते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्यानंतर पक्षाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला. त्यामुळे अजित पवार यांनी हा राष्ट्रीय दर्जा परत मिळवण्याच्या आशेने बिहारच्या निवडणुकीत उमेदवार उतरवले होते. परंतु, या सर्व उमेदवारांनी पार निराशा केल्याचे दिसत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत जे कल हाती आले, ते पाहता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकही उमेदवाराला आघाडीही घेता आलेली नाही.

बिहार निवडणुकीत अजित पवारांचे १५ उमेदवार रिंगणात

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एकाही उमेदवाराला जिंकणे तर दूर सोडा पण आघाडीही घेता आलेली नाही. १५ पैकी १३ जागांवर अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. अजित पवारांच्या या उमेदवारांना अद्याप ५०० मतांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. हे चित्र कायम राहिल्यास बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, १ वाजेपर्यंत जे कल हाती आले, त्यानुसार, एनडीएत घटक पक्ष असलेल्या भाजपाचे ९१ उमेदवार आघाडीवर आहेत. तर, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायडेट पक्षाचे ८१ उमेदवार आघाडीवर आहेत. महागठबंधनचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचे २६ उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे ४ उमेदवार आघाडीवर आहेत. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Election 2025: Ajit Pawar's NCP Fails, Candidates Lose Deposits?

Web Summary : Ajit Pawar's NCP faced a debacle in the Bihar elections. Most candidates are trailing significantly, unlikely to secure even 500 votes. Deposit forfeiture looms amidst NDA's strong lead.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस