मुंबई - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने २०२६ साठी दुसऱ्या संधीच्या सीईटीच्या तारखा जाहीर केल्या असून परीक्षा ९ मे ते २१ मे दरम्यान होणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दुसऱ्या संधीची सीईटी जाहीर झाली आहे. ही परीक्षा ९ मे ते २१ मे दरम्यान होणार असून ४ लाख ९२ हजार ३८३ विद्यार्थी बसणार आहेत.
पहिल्या संधीच्या सीईटीसाठी ८ लाख ९६ हजार २३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी ८ लाख ३३ हजार ४८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेला ९२.९९ टक्के उपस्थिती होती तर ६२ हजार ७५४ विद्यार्थी गैरहजर राहिले विद्यार्थ्यांचा प्रतिसाद समाधानकारक असल्याचे दिसून आले. राष्ट्रीय स्तरावर दोन परीक्षा घेतल्या जातात. त्या धर्तीवर राज्यातही दोन संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी परीक्षा ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. दोन्ही परीक्षा दिल्यास ज्या परीक्षेत जास्त टक्केवारी मिळेल तो निकाल ग्राह्य धरला जाणार आहे.
Web Summary : Maharashtra CET cell announces second CET opportunity for various courses from May 9-21. Nearly 4.92 lakh students will appear. A commendable 92.99% attendance was recorded in the first CET. Students can appear for one or both exams; the higher score will be considered.
Web Summary : महाराष्ट्र सीईटी सेल ने 9-21 मई से विभिन्न पाठ्यक्रमों के लिए दूसरे सीईटी अवसर की घोषणा की। लगभग 4.92 लाख छात्र उपस्थित होंगे। पहले सीईटी में 92.99% उपस्थिति दर्ज की गई। छात्र एक या दोनों परीक्षाओं में शामिल हो सकते हैं; उच्च स्कोर पर विचार किया जाएगा।