Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 20:21 IST2025-10-12T20:17:57+5:302025-10-12T20:21:45+5:30
Bihar Election NDA Seat Sharing: भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जागावाटप जाहीर केले. भाजप आणि नितीश कुमार यांची जदयू शंभरपेक्षा जास्त जागा लढवणार आहे.

Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
Bihar Election 2025 NDA Seat Sharing: राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे रविवारी जागावाटप जाहीर करण्यात आले. भाजप आणि जनता दल युनायटेडला शंभरपेक्षा जास्त जागांवर उमेदवार उतरवायला मिळणार आहे. तर २०२० मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीवेळी चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने स्वतंत्र चूल मांडली होती. पण, यावेळी एनडीएमध्येच राहिले. त्यामुळे यावेळी जागावाटपात नितीश कुमारांच्या जदयूला जास्त त्याग करावा लागला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विधानसभा निवडणुकीत भाजप १०१ जागा लढवणार आहे. तर जनता दल यूनायटेड सुद्धा १०१ जागा लढवणार आहे. चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) २९ जागांवर उमेदवार उतरवणार आहे. जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तान अवाम मोर्चाच्या वाट्याला ६ जागा आल्या आहेत.
बिहार विधानसभा: एनडीएमध्ये कुणाला कमी जागा मिळाल्या?
२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत राज्यातील समीकरणे बदलेली आहेत. त्यामुळे एनडीएमध्येही जागावाटपात तडजोडी कराव्या लागल्याचे दिसत आहे.
२०२० मध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने ११५ जागा लढवल्या होत्या, तर भाजपने ११० जागा लढवल्या होत्या.
जीतन राम मांझी यांच्या हम पक्षाच्या वाट्याला ७ जागा आल्या होत्या. तर व्हिआयपी पक्षाला ११ जागा देण्यात आल्या होत्या.
चिराग पासवान २०२० मध्ये लढले होते स्वतंत्र
२०२० मध्ये चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष स्वबळावर निवडणूक लढला होता. तर त्यावेळी एनडीएचा घटक असलेली व्हिआयपी पार्टी यावेळी मात्र बाहेर पडली आहे. असे असले तरी जागावाटपात यावेळी भाजपला गेल्यावेळीच्या तुलनेत जागावाटपात ९ जागा कमी मिळाल्या आहेत. तर नितीश कुमारांच्या जदयूला १४ जागा मित्रपक्षांसाठी सोडाव्या लागल्या आहेत.
२०२० च्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमारांच्या जदयूने एनडीएमध्ये सर्वाधिक जागा लढवल्या होत्या, पण त्यांना ४३ जागाच जिंकता आल्या. भाजपने मात्र ७४ जागा जिंकल्या होत्या. हम पक्षाने ७ जागा लढवत ४ जिंकल्या होत्या.