Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 10:05 IST2025-12-27T10:04:09+5:302025-12-27T10:05:20+5:30
Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका कारने ड्युटीवर तैनात असलेल्या ट्रॅफिक डीएसपी (DSP) यांना पाठीमागून धडक दिली.

फोटो - ABP News
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका कारने ड्युटीवर तैनात असलेल्या ट्रॅफिक डीएसपी (DSP) यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात पोलीस अधिकारी जखमी झाले असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना त्यावेळी घडली जेव्हा मुख्यमंत्री गुरु गोविंद सिंग यांच्या 'प्रकाश पर्व' तयारीचा आढावा घेण्यासाठी पाटण्यातील गुरुद्वारा श्री हरमंदिर साहिब येथे पोहोचले होते.
घटनेच्या वेळी ट्रॅफिक डीएसपी वाहतूक व्यवस्था सांभाळत होते. त्याचवेळी ताफ्यातील एका कारने अचानक रिव्हर्स घेण्यास सुरुवात केली आणि विरुद्ध दिशेला तोंड करून उभ्या असलेल्या डीएसपींना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ते रस्त्यावर पडले आणि जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत जखमी अधिकाऱ्याला मदत केली आणि परिस्थिती हाताळली.
बिहार के दीदारगंज से सामने आए वीडियो में मुख्यमंत्री नीतीश कुमार के कारकेड में शामिल एक स्कॉर्पियो वाहन ने ड्यूटी पर तैनात DSP को टक्कर मार दी। गनीमत रही कि इस घटना में कोई बड़ा हादसा नहीं हुआ।#Bihar#NitishKumar#Didarganj#BreakingNewspic.twitter.com/8Mab2BJ8Vy
— iMayankofficial 🇮🇳 (@imayankindian) December 27, 2025
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरला गाडी मागे घेण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी गाडीवर जोरात थाप मारली आणि ओरडून सावध केले. जर वेळीच गाडी थांबली नसती, तर मोठा अपघात होऊ शकला असता, असंही त्यांनी सांगितलं. ही घटना दीदारगंज मार्केट कमिटी क्षेत्रातील वॉच टॉवरजवळ घडली.
मुख्यमंत्री शिखांचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंग यांच्या प्रकाश पर्वासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांची पाहणी करत होते. ताफ्यातील गाड्या सहसा अत्यंत नियंत्रित वेगात चालतात, मात्र या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याची सुरक्षा आणि प्रोटोकॉलवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जखमी डीएसपींना तत्काळ वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत.