14 Nov, 25 10:29 AM
कलांमध्ये भाजपा पुढे, खासदार म्हणाल्या- "जे वाटलं तेच घडलं, NDAचा विजय निश्चित"
भाजप खासदार अपराजिता सारंगी म्हणाल्या, "आम्हाला वाटले होते तसेच घडत आहे. एनडीएचा विजय निश्चित आहे आणि आम्ही सर्वजण आनंदी आहोत. मी हे नक्कीच सांगेन की सीता मैया आणि भगवान राम यांच्या आशीर्वादाने, आम्ही निश्चितच एका जबरदस्त विजयाकडे वाटचाल करत आहोत आणि नक्कीच जिंकू... मला वाटते की बिहारच्या लोकांनी राहुल गांधींनी SIRबद्दल केलेले युक्तिवाद नाकारले आहेत."
14 Nov, 25 10:23 AM
नितीश कुमारांची जेडीयू आणि भाजपा दोन्ही पक्षांची जोरदार मुसंडी
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, नितीश कुमार यांचा JDU पक्ष आणि भाजपा दोन्ही पक्ष ७०-७० जागांवर आघाडीवर आहेत. त्याशिवाय तेजस्वी यादव यांचा RJD पक्ष ४० जागांवर आघाडीवर आहे.
14 Nov, 25 09:54 AM
आरजेडी नेते सुरुवातीच्या कलांवर काय म्हणाले?
निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांवर भाष्य करताना, आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, स्पर्धा काँटे की टक्कर दिसत असली तरी, आरजेडीच्या नेतृत्वाखालील महागठबंधन अनेक ठिकाणी आघाडीवर आहे. आम्हाला आशा आणि विश्वास आहे की एक-दोन तासांत हे स्पष्ट होईल की बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन करत आहे.
14 Nov, 25 09:38 AM
सुरुवातीच्या कलांमध्ये NDA ने गाठली 'मॅजिक फिगर'
सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएला बहुमत आहे. ते १५०पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहेत. बहुमताचा आकडा १२२ आहे. भाजप ७० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे, तर जेडीयू ६०पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तर आरजेडी ७० जागांवर आघाडीवर आहे. तर महागठबंधन ११२ जागांवर पुढे आहे.
14 Nov, 25 08:50 AM
बिहारमध्ये मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीचे कल हाती, NDA आघाडीवर
बिहारमध्ये ८ वाजता पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली. त्यानंतर ८.३० वाजल्यापासून इव्हीएम मतमोजणीला सुरूवात झाली. सुरुवातींच्या कलांमध्ये NDA आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
14 Nov, 25 08:08 AM
मतमोजणी केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त
बिहारमध्ये मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
14 Nov, 25 08:05 AM
बिहारमध्ये मतमोजणीला सुरूवात, २४३ जागांसाठी झालेले मतदान
बिहार निवडणूक २०२५ची मतमोजणी सुरू. राज्यातील ३८ जिल्ह्यांमधील सर्व २४३ मतदारसंघांमधील उमेदवारांचे भवितव्य आज निश्चित होणार. ६ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशातील ८ मतदारसंघांमधील विधानसभा पोटनिवडणुकांसाठीही मतमोजणी सुरू.
14 Nov, 25 07:40 AM
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार?
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वीच मुख्यमंत्रीपदाची चर्चा रुंगू लागली आहे. दरम्यान लोजपा (रामविलास) ने मोठा दावा केला आहे. पक्षाच्या खासदार शांभवी चौधरी यांनी पाटण्यात पत्रकारांशी बोलताना, “बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होईल आणि नीतीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.”
14 Nov, 25 07:37 AM
बिहारमध्ये तब्बल ६७.१३ टक्के विक्रमी मतदान
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान झाले होते. या निवडणुकीत मतदानाचा नवा विक्रम नोंदवला गेला. दोन्ही टप्प्यांत मिळून तब्बल ६७.१३ टक्के विक्रमी मतदान झाले. बिहारमध्ये एकूण ७,४५,२६,८५८ मतदार असून, यापैकी ५ कोटींहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला होता.
14 Nov, 25 07:32 AM
बिहारमध्ये सत्तापालट होणार? ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात
सकाळी ८ नंतर पोस्टल मतदानाची मोजणी सुरुवातीला होणार. सकाळी ८.३० वाजता ईव्हीएमद्वारे मतदानाची मोजणी सुरू होणार. ४६ मतमोजणी केंद्रांवर मोजणी केली जाणार. एकूण २,६१६ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण मतदान ६७.१३ टक्के झाल्याने बिहारमध्ये सत्तापालट होणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
14 Nov, 25 07:31 AM
NDA मित्रपक्षांना विजयाचा विश्वास, आधीच बॅनरबाजी
बिहारमध्ये मतमोजणी सुरू होण्याआधीच NDA ला विजयाचा विश्वास आहे. RJD च्या कार्यालयाबाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे. यावर पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांचे मोठे फोटो दिसत आहेत.
14 Nov, 25 07:28 AM
आज ठरणार नवा मुख्यमंत्री, आज मतमोजणी
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. राज्यातील सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण हे ठरवण्यासाठी सुमारे ५ कोटी मतदारांनी दिलेला कौल काही वेळातच समोर येणार आहे. या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली असून, संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षा राखण्यासाठी निर्देश दिले आहेत.