शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
4
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
5
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
6
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
7
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
8
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
9
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
10
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
11
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
12
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
13
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
14
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
15
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
16
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
17
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
18
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
19
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
20
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

’पुत्र मोहापायी लालू बनले धृतराष्ट्र’, बिहारमधील दारुण परभावानंतर ज्येष्ठ नेत्याने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:41 IST

Bihar Assembly Election Result: राष्ट्रीय जनता दल पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे फार पूर्वीपासूनचे सहकारी शिवानंद तिवारी यांनी लालूप्रसाद यादव यांच्यावर बोचरी टीका केली आहे. पुत्रप्रेमाच्या मोहापायी लालूप्रसाद यादव हे धृतराष्ट्र बनले असल्याची टीका शिवानंद तिवारी यांनी केली आहे.

नुकत्याच लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर लालूंच्या कुटुंबात मतभेद उफाळून आले असून, लालूंच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी कुटुंबाशी असलेले नातेसंबंध तोडण्याची घोषणा केली. एवढंच नाही तर तेजस्वी यादव यांनी बहीण रोहिणी आचार्य यांना अपमानित केल्याचाही दावा केला जात आहे. यादरम्यान, आता राष्ट्रीय जनता दल पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे फार पूर्वीपासूनचे सहकारी शिवानंद तिवारी यांनी लालूप्रसाद यादव यांच्यावर बोचरी टीका केली आहे. पुत्रप्रेमाच्या मोहापायी लालूप्रसाद यादव हे धृतराष्ट्र बनले असल्याची टीका शिवानंद तिवारी यांनी केली आहे.

शिवानंद तिवारी यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमधून लालूप्रसाद यादव यांच्यावर ही टीका केली आहे. यावेळी लालूप्रसाद यादव यांच्यासोबत आणीबाणीवेळी भोगलेल्या तुरुंगावासाच्या आठवणींना उजाळा देतानाच लालूंच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.  तिवारी म्हणाले की, लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांनी खूप जोर लावला, मात्र त्यांच्या पक्षाचे केवळ २५ आमदारच निवडून आले. मी स्वत: पक्षाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष  होतो, असं असताना असं का बोलत हे, असं कुणालाही वाटेल, मात्र तो आता भुतकाळ झालाय. तेजस्वी यादव यांनी मला उपाध्यक्षपदावरून हटवलं, एवढंच नाही तर कार्यकारिणीमध्येही स्थान दिलं नाही. कारण मी मतदार याद्यांच्या पुनरीक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा लोकशाहीविरुद्धचा कट असल्याचं म्हटलं होतं.

मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाविरोधात राहुल गांधींसोबत रस्त्यावर उतरा, संघर्ष करा, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खा, तुरुंगात जा, असा सल्ला मी तेजस्वी यादव यांना दिला होता. मात्र तेजस्वी यादव हे आपल्या स्वप्नांच्या दुनियेत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत होते. त्यांना वास्तवाची जाणीव करून देत मी त्यांचा स्वप्न भंग करत होतो. तर लालू यादव धृतराष्ट्राप्रमाणे मुलासाठी राजसिंहासन गरम करत होते. मात्र आता मी मुक्त झालो आहे, आता मी असा कहाण्या ऐकवत राहीन, असे संकेतही शिवानंद तिवारी यांनी दिले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Lalu Blinded by Son's Ambition, Became Dhritarashtra: Senior Leader

Web Summary : Following RJD's defeat in Bihar, Shivananad Tiwari criticized Lalu Yadav for prioritizing his son's ambition over party interests, comparing him to Dhritarashtra. Tiwari recounted past sacrifices, questioned Lalu's politics, and criticized Tejashwi Yadav's leadership.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Rashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवTejashwi Yadavतेजस्वी यादव