'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 17:52 IST2025-11-14T17:51:19+5:302025-11-14T17:52:12+5:30
Bihar Assembly Election Result 2025: अमित शाहांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि एनडीएतील सर्व नेते व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Bihar Assembly Election Result 2025:बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपच्या नेतृत्वातील एनडीएने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटले की, “हा विकसित बिहारमध्ये विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक बिहारीचा विजय आहे. जंगलराज आणि तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्यांना बिहारची जनता कुठल्याही परिस्थितीत संधी देणार नाही.”
घुसखोरांचा मुद्दा; विरोधकांवर थेट निशाणा
अमित शाह म्हणाले, “बिहारवासियांनी दिलेले एक-एक मत हा भारताच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या घुसखोरांच्या आणि त्यांच्या संरक्षकांच्या विरोधात मोदी सरकारच्या धोरणांवरील विश्वासाचे प्रतीक आहे. या निकालातून व्होटबँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना बिहारच्या जनतेने योग्य उत्तर दिले आहे.”
यह ‘विकसित बिहार’ में विश्वास रखने वाले हर बिहारवासी की जीत है।
— Amit Shah (@AmitShah) November 14, 2025
जंगलराज और तुष्टीकरण की राजनीति करने वाले किसी भी भेष में आएँ, उन्हें लूटने का मौका नहीं मिलेगा। जनता अब सिर्फ और सिर्फ ‘Politics of performance’ के आधार पर जनादेश देती है।
श्री @narendramodi जी, श्री @NitishKumar…
ते पुढे म्हणाले, “बिहारने देशाचा मूड स्पष्टपणे दाखवला. मतदार यादीचे शुद्धीकरण आवश्यक आहे आणि त्यास विरोध करणाऱ्या राजकारणाला जागा नाही. म्हणूनच राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आज बिहारमध्ये शेवटच्या पायरीवर पोहोचली आहे,” अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
विकसित बिहारवर विश्वास ठेवणाऱ्यांचा विजय
अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि एनडीएतील सर्व नेते व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले, “जनता आता केवळ परफॉर्मन्स आधारित राजकारणाला मत देते. बूथपासून राज्यपातळीपर्यंत मेहनत केलेल्या प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांना माझे अभिवादन. ज्या विश्वासाने बिहारच्या जनतेने, विशेषत: माता-बहिणींनी एनडीएला बहुमत दिले, त्याहून अधिक समर्पणाने एनडीए त्याची पूर्तता करेल.”
एनडीए प्रचंड बहुमताच्या दिशेने
ताज्या आकडेवारीनुसार, एनडीए 200+ जागांवर आघाडीवर असून लवकरच अधिकृत विजयी आकडे जाहीर होतील.
भाजप : 91 जागा(सर्वात मोठा पक्ष)
जेडीयू : 83 जागा
एलजेपी (आर) : 19 जागा
हम : 5 जागा
आरएलएम : 4 जागा