शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! या कंपनीने देशभरात वाढविले इंधनाचे दर; पेट्रोल ५.३०, डिझेल ३ रुपयांनी महागले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:45 IST

Petrol Diesel Price Hike Latest news: इराण-अमेरिका युद्धामुळे भारतात इंधन दरवाढ. नयारा एनर्जीने पेट्रोल ५.३० रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी महागले. होर्मुझ स्ट्रेटमधील तणावामुळे इंधन टंचाईची भीती. वाचा सविस्तर.

देशातील सर्वात मोठी खासगी इंधन किरकोळ विक्रेता कंपनी नयारा एनर्जीने आपल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. यासोबतच, कंपनीने आपली गुजरातमधील 'वाडीनार' रिफायनरी ३५ दिवसांसाठी अंशतः बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या पार गेल्याने नयारा एनर्जीने इंधन दरात वाढ केली आहे. सरकारी तेल कंपन्यांच्या IOC, BPCL, HPCL तुलनेत नयाराचे दर आता काही प्रमाणात जास्त असणार आहेत.

३५ दिवसांचे 'शटडाउन'नयारा एनर्जीने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील वाडीनार येथील रिफायनरीच्या नियोजित देखभाल-दुरुस्तीसाठी ३५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. हे काम मे महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. या काळात रिफायनरीचे कामकाज पूर्णपणे किंवा अंशतः बंद राहील. रिफायनरी बंद असली तरी, कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आणि पेट्रोल पंपांसाठी इंधनाचा पुरेसा साठा करून ठेवला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शटडाउन काळात पुरवठ्यात कोणतीही मोठी अडचण येणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे.

नवीन दरवाढ किती?नयारा एनर्जीने लागू केलेले नवीन दर खालीलप्रमाणे आहेत:

पेट्रोल: प्रति लिटर ५.३० रुपयांची वाढ.

डिझेल: प्रति लिटर ३.०० रुपयांची वाढ.

खाजगी कंपन्यांच्या या निर्णयामुळे आता सरकारी तेल कंपन्यांवरही दर वाढवण्यासाठी दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

मध्यपूर्वेतील युद्धाचा फटकाइराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. नयारा एनर्जी रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करते, मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे वाहतूक खर्च आणि विम्याच्या हप्त्यांमध्ये वाढ झाली आहे, ज्याचा परिणाम दरांवर झाला आहे.

बिहारमध्ये सर्वच कंपन्यांनी दर वाढविले...आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ आणि मध्यपूर्वेतील तणावाचा थेट परिणाम आता बिहारमधील इंधन दरांवर दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांत प्रीमियम पेट्रोल आणि इंडस्ट्रियल डिझेलच्या किमती वाढल्यानंतर, आता सामान्य पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे पेट्रोलने ११० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, पेट्रोलमध्ये प्रति लिटर ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जुनी किंमत १०५.३५ रुपयांवरून आता ११०.३५ रुपये झाली आहे. तर डिझेलमध्ये प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जुनी किंमत ९१.५८ रुपयांवरून आता ९४.५८ रुपये झाली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Fuel Price Hike: Nayara Energy Increases Rates Nationwide

Web Summary : Nayara Energy raised fuel prices nationwide, petrol by ₹5.30/litre, diesel by ₹3/litre, due to rising crude oil prices and Middle East tensions. A 35-day refinery shutdown in Gujarat is planned. Bihar also saw price hikes across companies.
टॅग्स :Fuel Crisisइंधन टंचाईFuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलDieselडिझेलUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्धPrice Hikeदर वाढ