मोठी बातमी! या कंपनीने देशभरात वाढविले इंधनाचे दर; पेट्रोल ५.३०, डिझेल ३ रुपयांनी महागले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:45 IST2026-03-26T13:43:20+5:302026-03-26T13:45:30+5:30

Petrol Diesel Price Hike Latest news: इराण-अमेरिका युद्धामुळे भारतात इंधन दरवाढ. नयारा एनर्जीने पेट्रोल ५.३० रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी महागले. होर्मुझ स्ट्रेटमधील तणावामुळे इंधन टंचाईची भीती. वाचा सविस्तर.

Big news! Nayara Energy Petrol Diesel Price Hike company has increased fuel prices across the country; Petrol has become more expensive by Rs 5.30, diesel by Rs 3... | मोठी बातमी! या कंपनीने देशभरात वाढविले इंधनाचे दर; पेट्रोल ५.३०, डिझेल ३ रुपयांनी महागले...

मोठी बातमी! या कंपनीने देशभरात वाढविले इंधनाचे दर; पेट्रोल ५.३०, डिझेल ३ रुपयांनी महागले...

देशातील सर्वात मोठी खासगी इंधन किरकोळ विक्रेता कंपनी नयारा एनर्जीने आपल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. यासोबतच, कंपनीने आपली गुजरातमधील 'वाडीनार' रिफायनरी ३५ दिवसांसाठी अंशतः बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या पार गेल्याने नयारा एनर्जीने इंधन दरात वाढ केली आहे. सरकारी तेल कंपन्यांच्या IOC, BPCL, HPCL तुलनेत नयाराचे दर आता काही प्रमाणात जास्त असणार आहेत.

३५ दिवसांचे 'शटडाउन'
नयारा एनर्जीने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील वाडीनार येथील रिफायनरीच्या नियोजित देखभाल-दुरुस्तीसाठी ३५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. हे काम मे महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. या काळात रिफायनरीचे कामकाज पूर्णपणे किंवा अंशतः बंद राहील. रिफायनरी बंद असली तरी, कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आणि पेट्रोल पंपांसाठी इंधनाचा पुरेसा साठा करून ठेवला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शटडाउन काळात पुरवठ्यात कोणतीही मोठी अडचण येणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे.

नवीन दरवाढ किती?
नयारा एनर्जीने लागू केलेले नवीन दर खालीलप्रमाणे आहेत:

पेट्रोल: प्रति लिटर ५.३० रुपयांची वाढ.

डिझेल: प्रति लिटर ३.०० रुपयांची वाढ.

खाजगी कंपन्यांच्या या निर्णयामुळे आता सरकारी तेल कंपन्यांवरही दर वाढवण्यासाठी दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

मध्यपूर्वेतील युद्धाचा फटका
इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. नयारा एनर्जी रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करते, मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे वाहतूक खर्च आणि विम्याच्या हप्त्यांमध्ये वाढ झाली आहे, ज्याचा परिणाम दरांवर झाला आहे.

बिहारमध्ये सर्वच कंपन्यांनी दर वाढविले...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ आणि मध्यपूर्वेतील तणावाचा थेट परिणाम आता बिहारमधील इंधन दरांवर दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांत प्रीमियम पेट्रोल आणि इंडस्ट्रियल डिझेलच्या किमती वाढल्यानंतर, आता सामान्य पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे पेट्रोलने ११० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, पेट्रोलमध्ये प्रति लिटर ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जुनी किंमत १०५.३५ रुपयांवरून आता ११०.३५ रुपये झाली आहे. तर डिझेलमध्ये प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जुनी किंमत ९१.५८ रुपयांवरून आता ९४.५८ रुपये झाली आहे.

 

Web Title : ईंधन की कीमतों में वृद्धि: नयारा एनर्जी ने दरें बढ़ाईं

Web Summary : नयारा एनर्जी ने कच्चे तेल की बढ़ती कीमतों और मध्य पूर्व तनाव के कारण पूरे देश में ईंधन की कीमतें बढ़ाईं, पेट्रोल ₹5.30/लीटर और डीजल ₹3/लीटर महंगा हुआ। गुजरात में 35 दिनों के लिए रिफाइनरी बंद रहेगी। बिहार में भी सभी कंपनियों ने कीमतें बढ़ाईं।

Web Title : Fuel Price Hike: Nayara Energy Increases Rates Nationwide

Web Summary : Nayara Energy raised fuel prices nationwide, petrol by ₹5.30/litre, diesel by ₹3/litre, due to rising crude oil prices and Middle East tensions. A 35-day refinery shutdown in Gujarat is planned. Bihar also saw price hikes across companies.