शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

Sharad Pawar : राजकीय घडामोडींना मोठा वेग; शरद पवार - प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 12:51 PM

Big Breaking: Sharad Pawar - Prashant Kishor's meeting in Delhi: सध्या राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता, पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नवी दिल्ली - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर आणि काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारदिल्लीत पोहोचले आहेत आणि येथे त्यांच्या निवासस्थानी राजकारणातील रणनीतीकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांच्याशी त्यांची बैठक सुरू आहे. सध्या राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता, पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Big Breaking: Sharad Pawar - Prashant Kishor's meeting in Delhi at Pawar's residence)

आणखी कुणा कुणाला भेटणार पवार? - यापूर्वीही प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची राज्यात बैटक झाली होती आणि आता पुन्हा थेट दिल्लीतच पवार-किशोर बैठ होत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले असून ना-ना कयास लावले जात आहेत. यातच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राजकीय खळबळ माजवली आहे. या पत्रातून प्रताप सरनाईक यांनी भाजपासोबत युती करावी, यातच शिवसेनेला फायदा आहे, असे म्हटले आहे. सरनाईक यांच्या लेटरबॉम्बमुळे अक्षरशः राजकीय धुरळा उठला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत पोहोचले आहेत आणि त्यांनी येथे कदाचित किशोरांपासूनच बैठका घ्यायलाही सुवात केली आहे. यामुळे शरद पवार यांच्या मनात नेमकं चालय तरी काय? यावरच सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याच बरोबर यानंतर आता पवार नेमके कुणा कुणाला भेटतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 

प्रताप सरनाईकांच्या पत्रानंतर नेतृत्वाकडून शिवसेना आमदारांशी संपर्क; डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू

महाविकास आघाडी सरकारमध्ये वरून किर्तन आणि आतून गोंधळ -राज्यात महाविकास आघाडी सरकार सुरक्षित, सुरळित असल्याचे आणि ते पाच वर्षे टिकेल असेल दावे होत असले, तरी या सरकारचे वरून किर्तन आणि आतून गोंधळ सुरू असल्याचे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. नव्हे, ते प्रताप सरनाईक यांच्या पत्रने चव्हाट्यावरही आले आहे. अलीकडेच महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ दिल्लीला गेले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची 30 मिनिटे खासगीत भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात बदलाचे संकेत मिळत आहेत. या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी शरद पवारांनी शिवसेना हा धोका देणारा पक्ष नाही, असे म्हणत इंदिरा गांधींच्या आणीबाणी काळात बाळासाहेबांनी जो पाठिंबा दिला होता त्याचा दाखला दिला होता. मात्र, असे असले तरी, भाजपासोबत शिवसेना जाणार की राष्ट्रवादी यावरही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या दिल्ली दौऱ्यात शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट होणार का? हेदेखील अद्याप कळलेले नाही.

पवार विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटणार -राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार दिल्लीत गेले असून ते विरोधी पक्षाच्या नेत्यांचीही भेट घेणार आहेत. आजारपणानंतर  पवार दिल्लीत गेलेच नव्हते. मध्यंतरी दोन वेळा त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना डॉक्टरांनी प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. प्रकृती व्यवस्थित झाल्याने त्यांनी लांबवलेली दिल्ली भेट आता केली आहे. यातून कोणतेही वेगळे राजकीय अर्थ काढू नये, असे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

आम्ही वाघाच्या काळजाचे, मुख्यमंत्री ठाकरे प्रताप सरनाईकांच्या पाठिशी; संजय राऊतांनी विरोधकांना ठणकावलं

ठाकरे यंचा दिल्ली दौरा आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर, पवार यांच्या दिल्ली दौऱ्याचे राजकीय अर्थ काढणे सुरू झाले आहे. यावर बोलताना, याचा कोणताही राजकीय संदर्भ नाही. पक्षाचे नेते पूर्वनियोजित कार्यक्रमात व्यस्त आहेत. उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत, तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पूर्वनियोजित कार्यक्रमात व्यस्त आहेत, असे मलिक म्हणाले 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPrashant Kishoreप्रशांत किशोरNCPराष्ट्रवादी काँग्रेसdelhiदिल्ली