शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांची मोठी घोषणा, 23 ऑगस्टला घेण्यात येणार जेईई अॅडव्हांस परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 19:27 IST

लॉकडाउनमुळे देशातील अनेक प्रकारची कामे बंद आहेत. लॉकडाउनमुळे जेईई अॅडव्हांसची परीक्षाही होऊ शकली नव्हती.

ठळक मुद्दे23 अॉगस्ट, 2020 रोजी घेण्यात येणार जेईई अॅडव्हांस परीक्षाविद्यार्थ्यांनी स्वत:च अभ्यास करून परीक्षांची तयारी करावी, असे पोखरियाल यांनी म्हटले होतेयापूर्वी पोखरियाल यांनी विद्यार्थ्यांशी व्हिडीओ संवाद साधला होता

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने हात-पाय पसरले आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे देशातील अनेक प्रकारची कामे बंद आहेत. लॉकडाउनमुळे जेईई अॅडव्हांस परीक्षाही होऊ शकली नव्हती. मात्र, आता 23 अॉगस्ट, 2020 रोजी ही परीक्षा घेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही घोषणा केली आहे.

आणखी वाचा - Video : CoronaVirus; 4 वर्षांच्या 'या' कॅन्सर पीडित चिमुकलीने तब्बल 50 दिवसांनी घेतली वडिलांची गळाभेट

जवळपास 25 लाख विद्यार्थी देणार जेईई, नीटची परीक्षा -यापूर्वी, पोखरियाल यांनी म्हटले होते, की जेईई-मेन्स परीक्षा १८ ते २३ जुलैदरम्यान, तर जेईई-अ‍ॅडव्हान्स परीक्षा ऑगस्टमध्ये घेतली जाईल. नीट परीक्षा २६ जुलै रोजी होईल. दोन्ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) घेतल्या जातात. जेईईसाठी नऊ लाखांहून अधिक तर नीटसाठी १५.९३ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सर्वसाधारणपणे जूनमध्ये घेतल्या जाणाऱ्या या दोन्ही प्रवेश परीक्षा लॉकडाउनमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

आणखी वाचा - CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनानं आतापर्यंत बदललीयेत शेकडो रुपं, वैज्ञानिकांचे हात अद्यापही रिकामेच

विद्यार्थ्यांनी स्वत:च अभ्यास करून परीक्षांची तयारी करावी -या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम नेहमीपेक्षा कमी करण्यात आल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी कोचिंग क्लासेसच्या मागे न धावता स्वत: अभ्यास करून परीक्षांची तयारी करावी, असे आवाहनही पोखरियाल यांनी केले होते. यासाठी सरकारने सुरू केलेल्या स्वयम् व दीक्षा या डिजिटल शिकवण्यांचा फायदा घेता येईल.

विद्यार्थ्यांशी साधला होता व्हिडीओ संवाद - नंतर विद्यार्थ्यांशी व्हिडीओ संवाद साधताना पोखरियाल म्हणाले होते, की आयआयटी व एनआयटी या संस्थांनी आगामी शैक्षणिक वर्षात कोणत्याही अभ्यासक्रमाची फी वाढवू नये, असे त्यांना सुचविण्यात आले आहे. या संस्था स्वायत्त असल्या तरी त्या सरकारची विनंती मान्य करतील, अशी आशा आहे.

आणखी वाचा - Lockdown : कोरोना नव्हे, जगभरात 'या' व्हायरसमुळे होणार 14 लाख अधिक मृत्यू

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याexamपरीक्षाStudentविद्यार्थीIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारCentral Governmentकेंद्र सरकारcollegeमहाविद्यालय