Lockdown : कोरोना नव्हे, जगभरात 'या' व्हायरसमुळे होणार 14 लाख अधिक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 10:07 PM2020-05-06T22:07:29+5:302020-05-06T22:18:50+5:30

कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देशांत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे, आता लॉकडाउनमुळे इतर आजारांचा आणि त्यामुळे मरणारांची संख्या वाढण्याचा धोकाही वाढला आहे.

study says corona lockdown risks 14 lakh extra deaths sna | Lockdown : कोरोना नव्हे, जगभरात 'या' व्हायरसमुळे होणार 14 लाख अधिक मृत्यू

Lockdown : कोरोना नव्हे, जगभरात 'या' व्हायरसमुळे होणार 14 लाख अधिक मृत्यू

Next
ठळक मुद्देया रिसर्चनुसार, 2025पर्यंत टीबीमुळे 14 लाख मृत्यू अधिक होऊ शकतात टीबीवर यशस्वी उपचार उपलब्ध आहेत, तरीही यामुळे दरवर्षी लाखो लोक मरण पावतातटीबीमुळे भारत, केनिया आणि यूक्रेनसारखे देश अधिक प्रभावित होतील

लंडन : कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देशांत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लॉकडाउनची तर घोषणा झाली. पण, आता लॉकडाउनमुळे इतर आजारांचा आणि त्यामुळे मरणारांची संख्या वाढण्याचा धोकाही वाढला आहे. एका रिसर्चनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे ट्यूबरक्लोसिसमुळे (टीबी) होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ होऊ शकते. या रिसर्चनुसार, 2025पर्यंत टीबीमुळे 14 लाख मृत्यू अधिक होऊ शकतात.

आणखी वाचा - Lockdown : 30 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना मिळणार मोठी 'भेट'? सरकार लवकरच करू शकतं घोषणा 

टीबीच्या संसर्गात व्हायरसचा हल्ला संक्रमित व्यक्तीच्या फुफ्फुसावर होतो. अनेक ठिकाणी या आजारावर उपचार होतात. मात्र, असे असतानाही दरवर्षी जवळपास 1 कोटी लोक टीबीमुळे संक्रमित होतात. जागतीक आरोग्य संगघटनेच्या आकडेवारीनुसार, केवळ 2018मध्येच संपूर्ण जगात टीबीमुळे 15 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. यात जवळपास 2 लाख मुलांचा समावेश होता. 

सोशल डिस्टंसिंगच्या नियमांमुळे होणार अधिक मृत्यू -
टीबीवर यशस्वी उपचार उपलब्ध आहेत. तरीही यामुळे दरवर्षी लाखो लोक मरण पावतात. तज्ज्ञांच्या मते टीबीवरील उपचारातही टेस्टिंग आणि लवकरात लवकर उपचार सुरू करणे आवश्यक असते. तज्ज्ञ सांगतात, की कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाउन सुरू आहे. यामुळे टीबीचा आजार घातक रूप धारण करून परतू शकतो. कारण हेल्थ वर्कर्स सोशल डिस्टंसिंगच्या नियमांच्या पालणामुळे संक्रमित रुग्णांची वेळेवर टेस्ट करू शकणार नाहीत. परिणामी रुग्णांना वेळेवर उपचार मिळाणार नाही. अशा परिस्थितीत टीबी घातक सिद्ध होऊ शकतो आणि यामुळे लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

आणखी वाचा - 'अशी' आहे रियाज नायकूच्या खात्म्याची 'इनसाइट स्टोरी'; भुयारातून करायचा ये-जा, जवानांनी तेथेच खोदली कबर

सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये भारत -
कोरोना व्हायरसमुळे आता नव्याच प्रकारची समस्या समोर येत आहे. यामुळे इतर संक्रमित आजारांचा धोकाही वाढला आहे. लंडनच्या इंपिरियल कॉलेजच्या आकडेवारीनुसार, टीबीमुळे भारत, केनिया आणि यूक्रेनसारखे देश अधिक प्रभावित होतील.

संबंधित आकडेवारीनुसार, दोन महिन्यांच्या अतिरिक्त लॉकडाउनमुळे संपूर्ण जगात 5 वर्षांत टीबीचा संसर्ग झालेले 18 लाख अधिक रुग्ण समोर येऊ शकतात. यामुळे जवळ-जवळ 3 लाख 40 हजार जणांचा मृत्यू होऊ शकतो.

आणखी वाचा - CoronaVirus, LockdownNews: लॉकडाउनचं उल्लंघन करणाऱ्यांना उघडं करून मारतोय 'ड्रग लॉर्ड' अल चापोचा मुलगा

Web Title: study says corona lockdown risks 14 lakh extra deaths sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.