Lockdown : 30 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना मिळणार मोठी 'भेट'? सरकार लवकरच करू शकतं घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 08:24 PM2020-05-06T20:24:51+5:302020-05-06T20:54:00+5:30

ज्या कर्मचाऱ्यांची ग्रॉस सॅलरी 30,000 रुपये आहे. त्यांना ईएसआय कव्हरेजचा  फायदा मिळेल. ईएसआयसी योजनेत आजारी पडल्यानंतर सॅलरी प्रोटेक्शनही दिले जाते.

government may announce big relief for esic members sna | Lockdown : 30 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना मिळणार मोठी 'भेट'? सरकार लवकरच करू शकतं घोषणा 

Lockdown : 30 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना मिळणार मोठी 'भेट'? सरकार लवकरच करू शकतं घोषणा 

Next
ठळक मुद्देकेंद्र सरकारने आता ईएसआय योजनेचा विस्तार करण्याची तयारी सुरू केली आहेजास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना मेडिकल आणि कॅश बेनिफिट देण्याच्या उद्देशाने सरकार ईएसआयसीअंतर्गत कव्हरेजची सीमा वाढवू शकतेयासंदर्भात कामगार मंत्रालयाने अर्थमंत्र्यांना हा प्रस्ताव पाठवला आहे


नवी दिल्ली :  कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी देशात सुरू असलेल्या लॉकडाउनदरम्यान सामान्य नागरिकांना आधार म्हणून सरकार सातत्याने पावले उचलत आहे. यातच केंद्र सरकारने आता ईएसआय योजनेचा विस्तार करण्याची तयारी सुरू केली आहे. 'सीएनबीसी आवाज'च्या सूत्रांनुसार कमी पगार असणाऱ्या जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना मेडिकल आणि कॅश बेनिफिट देण्याच्या उद्देशाने सरकार ईएसआयसीअंतर्गत कव्हरेजची सीमा वाढवू शकते. यासंदर्भात कामगार मंत्रालयाने कव्हरेजसाठी कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या पगाराची मर्यादा वाढवण्यासंदर्भात अर्थ मंत्रालयाला प्रस्ताव सादर केला आहे. 

30 हजार रुपयांपर्यंत पगार असणाऱ्यांना मिळणार फायदा - 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांच्या कव्हरेजसाठी पगाराची सीमा वाढविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. कामगार मंत्रालयाने अर्थमंत्र्यांना हा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावानुसार पगाराची सीमा 21000 रुपयांवरून 30,000 रुपयांपर्यंत वाढविण्यात यावी, असे म्हटले आहे.

आणखी वाचा - 'अशी' आहे रियाज नायकूच्या खात्म्याची 'इनसाइट स्टोरी'; भुयारातून करायचा ये-जा, जवानांनी तेथेच खोदली कबर

ज्या कर्मचाऱ्यांची ग्रॉस सॅलरी 30,000 रुपये आहे. त्यांना ईएसआय कव्हरेजचा  फायदा मिळेल. ईएसआयसी योजनेत आजारी पडल्यानंतर सॅलरी प्रोटेक्शनही दिले जाते. या योजनेचा विस्तार केल्याने कंपन्यांवरील ओझे हलके होईल. एवढेच नाही, तर लॉकडाउनमध्ये आवश्यक मेडिकल कव्हरचे ओझेही कमी होईल. सध्या जवळपास 12.50 लाखा कंपन्यांना फायदा मिळत आहे.

ज्यांचे मासिक वेतन 21 हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे कमितकमी 10 कर्मचारी असलेल्या कंपनीमध्ये काम करतात, अशा सर्वकर्मचाऱ्यांना ईएसआय योजनेचा लाभ मिळतो. यापूर्वी 2016पर्यंत मासिक वेतनाची मर्यादा 15 हजार रुपये एवढी होती. ती 1 जनवरी, 2017पासून 21 हजार रुपये एवढी करण्यात आली आहे.

आणखी वाचा - CoronaVirus, LockdownNews: लॉकडाउनचं उल्लंघन करणाऱ्यांना उघडं करून मारतोय 'ड्रग लॉर्ड' अल चापोचा मुलगा

 

Read in English

Web Title: government may announce big relief for esic members sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.