झारखंडमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 10 जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 11:07 AM2019-03-09T11:07:13+5:302019-03-09T11:08:36+5:30

रांचीच्या हटियायेथील रेल्वे कॉलनीमध्ये राहणारे सिंह कुटुंबिय बिहारच्या भोजपूर येथील एका मौजीबंधन कार्यक्रमाहून येत होते

big accidents in Jharkhand; Ten people from a family were killed | झारखंडमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 10 जण ठार

झारखंडमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 10 जण ठार

Next

रांची : झारखंडची राजधानी रांचीजवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका कुटुंबातील 10 जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. रांची जवळच्या कूजू घाटात डंपर आणि इनोव्हा कारमध्ये हा अपघात झाला.


रांचीच्या हटियायेथील रेल्वे कॉलनीमध्ये राहणारे सिंह कुटुंबिय बिहारच्या भोजपूर येथील एका मौजीबंधन कार्यक्रमाहून येत होते. यावेळी कूजू घाटात डंपरवर कार जाऊन आदळली. यामध्ये सत्यनारायण सिंह, मुलगा अजित सिंह, जावई मंटू सिंह आणि सुबोध सिंह, गाडीचे चालक विजय हे ठार झाले आहेत. तर कुटुंबातील दोन महिला आणि तीन मुलांचाही मृतांमध्ये समावेश आहे. 


कारमधील सर्वजण जागीच ठार झाले असून सर्वजण एकाच कुटुंबातील आहे. त्याच मृतदेह रामगड हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहेत. 
 

Web Title: big accidents in Jharkhand; Ten people from a family were killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात