शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

"८१ मृतदेहांवर अद्याप अंत्यसंस्कार झाले नाहीत", स्थानिक महापौरांनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 6:36 PM

 Odisha Train Accident : ओडिशात झालेल्या रेल्वे अपघातानं अवघ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणलं.

Odisha Tragedy : ओडिशात २ जून रोजी झालेला रेल्वेअपघात म्हणजे एक वाईट स्वप्नच. या भीषण अपघाताने अनेकांना पोरकं केलं, काहींनी आपले नातेवाईक गमावले, कोण अनाथ झाला तर कोणाच्या डोक्यावरचं 'बाप' नावाचं छत्र हरपलं. २९० जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. खरं तर अद्याप ८१ मृतदेहांची ओळख पटली नसल्याची धक्कादायक माहिती स्थानिक महापौरांनी दिली आहे. तसेच हे मृतदेह एम्स रूग्णालयात ठेवण्यात आले असल्याचे भुवनेश्वर महानगरपालिकेच्या महापौर सुलोचना दास यांनी सांगितले. 

स्थानिक महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशा रेल्वे अपघातातील ८१ मृतदेह एम्समध्ये ठेवण्यात आले आहेत. अनेकांनी एकाच मृतदेहावर दावा ठोकल्यामुळे प्रशानसनाला अडचणी येत आहेत. त्यांना डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. नमुने दिल्लीला पाठवण्यात आले असून २१ जणांची पुष्टी झाली आहे. मृतदेह घेण्यासाठी ५ कुटुंबे आली आहेत. सरकारी आदेशानुसार, अंत्यसंस्कारासाठी कोणतीही अडचण नसल्यास पुढील प्रक्रिया पार पाडावी लागेल. मृतदेह त्यांच्या मूळ भागात हलवण्याची गरज आहे. यासाठी आम्ही गाड्यांची व्यवस्था केली आहे. ज्या मृतदेहांवर कोणीही दावा केला नाही, त्यांच्यावरही अंत्यसंस्कार केले जातील. त्यासाठी आम्ही दोन स्मशानभूमींची व्यवस्था केली आहे. 

२९० जण दगावले २ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता बालासोर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला. या अपघातात २९० जणांचा मृत्यू झाला तर १२०० हून अधिक जण जखमी झाले होते. अवघ्या विश्वाच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या रेल्वे अपघातात तब्बल २९० जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या दुर्देवी घटनेनंतर ३ जून रोजी ओडिशात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातAIIMS hospitalएम्स रुग्णालयDeathमृत्यूMayorमहापौर