"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 16:48 IST2025-11-11T16:46:41+5:302025-11-11T16:48:17+5:30
मुलीचे कुटुंबीय तिचं लावून देत होते. पण तिची स्वप्न मोठी असल्याने तिने घर सोडलं.

AI फोटो
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलीने IAS होण्यासाठी आपलं घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला. मुलीचे कुटुंबीय तिचं लावून देत होते. पण तिची स्वप्न मोठी असल्याने तिने घर सोडलं. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला. वडिलांनी तर थेट हायकोर्टात धाव घेतली आहे.
एसीपी बिट्टू शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरिया पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. भोपाळची रहिवासी असलेली साक्षी १२ वीत ९२% गुण मिळवून पहिली आली होती, तिला पुढे शिक्षण घ्यायचं होतं आणि आयएएस अधिकारी व्हायचं होतं, परंतु तिचे कुटुंबाची अत्यंत जुन्या मानसिकतेचे होते. त्यांना तिचं लग्न लावायचं होतं. त्यासाठी तिच्यावर दबावही टाकला.
"मी २०३० मध्ये IAS होऊनच घरी परत येईन"
IAS होण्यासाठी तिने घर सोडलं. साक्षीच्या कुटुंबाने तिला शोधण्याचे प्रयत्न केले पण ती सापडली नाही. वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्यानंतर उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. न्यायालयाने पोलिसांना साक्षीचा शोध घेण्याचे आदेश दिले आणि पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान, पोलिसांना साक्षीच्या मित्रांकडे एक नोट सापडली, ज्यामध्ये तिने "मी २०३० मध्ये IAS अधिकारी होऊनच घरी परत येईन" असं म्हटलं होतं.
साक्षीचं लोकेशन शोधलं
पोलिसांनी यानंतर वेगाने तपास केला आणि देशभरातील कोचिंग सेंटर, महाविद्यालये आणि ग्रंथालये शोधली. काही दिवसांपूर्वी साक्षीने तिचे आधार अपडेट केले तेव्हा या प्रकरणात एक नवीन वळण आलं. तिचं आधार अपडेट होताच, पोलिसांनी साक्षीचं लोकेशन शोधलं, ती इंदूरमध्ये असल्याचं समोर आलं. पोलिसांचं एक पथक ताबडतोब इंदूरला पोहोचलं आणि साक्षीला शोधलं.
साक्षीने सांगितलं की, ती घरापासून दूर असताना सुरुवातीला ललितपूरमध्ये राहत होती आणि नंतर इंदूरला गेली, जिथे तिने १८,००० रुपये पगाराची नोकरी केली आणि भाड्याच्या खोलीत राहत होती. त्यानंतर पोलिसांनी साक्षीला न्यायाधीशांसमोर हजर केलं, त्यावेळी तिच्या पालकांना फटकारलं आणि तिला तिच्या कुटुंबासोबत राहण्याचा सल्ला देण्यात आला.