शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा भय्याजी जोशी की दत्तात्रय होसबळे?

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

पुन्हा भय्याजी जोशी की दत्तात्रय होसबळे?

पुन्हा भय्याजी जोशी की दत्तात्रय होसबळे?

कोण होणार सरकार्यवाह : संघ परिवारात उत्सुकता

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरकार्यवाह पदासाठी भय्याजी जोशी यांनाच परत संधी मिळणार असल्याची संघ वर्तुळातून चर्चा असली तरी सहसरकार्यवाह असलेल्या दत्तात्रय होसबळे यांच्या नावाचादेखील विचार होण्याची शक्यता आहे. संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात नागपूर येथे होणार्‍या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत यासंदर्भात अखेरचा निर्णय होणार आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये संघाच्या प्रयत्नांना मिळालेल्या यशानंतर होणार्‍या या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
संघात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. महानगर संघचालकांच्या निवड प्रक्रियेनंतर आता सर्वांचे लक्ष मार्च महिन्यात होणार्‍या प्रतिनिधी सभेकडे लागले आहे. या सभेत सरकार्यवाह (संघातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे पद) या पदाची निवड होणार आहे. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या निवड प्रक्रियेत सहभागी होतील. या सभेत रिक्त जागादेखील भरण्यात येतील, तसेच संघटनविषयक बाबींसह सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
२०१२ मध्ये या पदावर भय्याजी जोशी यांची फेरनिवड झाली होती. संघातील सूत्रानुसार यावेळी त्यांची सलग तिसर्‍यांदा फेरनिवड जवळपास निश्चित मानली जात आहे. परंतु गेल्या तीन वर्षांतील संघाने घेतलेले धोरण आणि राजकारणात वाढलेली सक्रियता यामुळे यंदा संघाकडून धक्का देण्यात येण्याची शक्यता आहे. तुलनेने तरुण असलेले सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या नावाचादेखील विचार होण्याची प्रबळ शक्यता वर्तविण्यात येत आहे.
२०१२ मध्ये होसबळे यांचे नाव समोर आले होते. परंतु जोशी यांचीच फेरनिवड करण्यात आली होती. परंतु गेल्या तीन वर्षांत होसबळे यांनी संघाच्या प्रसारात अन् निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. लोकसभा निवडणूकांमध्ये त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रमुखपद, सह बौद्धिक प्रमुख या जबाबदार्‍या यशस्वीरीत्या सांभाळल्या आहेत.

चौकट
तरुण चेहर्‍याला मिळणार संधी?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चेहरा तरुण करण्याच्या हालचाली सुुरू झाल्या आहेत. याच अनुषंगाने संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या जागेवर दत्तात्रय होसबळे यांची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भय्याजी जोशी हे सत्तरीजवळ पोहोचले आहेत. होसबळे हे तुलनेने तरुण आहेत; शिवाय ते पंतप्रधान मोदी यांचेदेखील निकटवर्तीय मानण्यात येतात.